Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Home Loan: एसबीआयच्या ग्राहकांसाठी विशेष गृहकर्ज योजना, 31 ऑगस्ट पर्यंत मुदत

SBI Home Loan

SBI Home Loan Special Offer: एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणली आहे. ग्राहकांना हा लाभ मर्यादित कालावधीसाठी दिल्या जात आहे. जर तुम्ही स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल आणि गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

SBI Home Loan:  एसबीआय बँकेने ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणली आहे. ग्राहकांना हा लाभ मर्यादित कालावधीसाठी दिल्या जात आहे. जर  तुम्ही स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल आणि गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क कमी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सवलतीच्या दरासह गृहकर्जावर 50% ते 100% सूट देत आहे. ही सवलत रेग्युलर होम लोन, फ्लेक्सिपे, एनआरआय आणि ऑन होमवर उपलब्ध आहे. ग्राहकांना 31 ऑगस्ट 2023 पर्यंत SBI गृहकर्जावर प्रक्रिया शुल्क माफ केले जात आहे.

प्रोसेसिंग फीवर सूट

SBI च्या अधिकृत वेबसाईटनुसार, HL आणि Top Up च्या सर्व प्रकारांवर कार्ड दरावर 50% सूट आहे. येथे तुम्हाला GST सोबत किमान 2,000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल. टेकओव्हर, पुनर्विक्री आणि रेडी टू मूव इन प्रॉपर्टीज शुल्कावर 100 टक्के सूट मिळेल. परंतु, इन्स्टा होम टॉप अप, रिव्हर्स मॉर्टगेज आणि ईएमडीसाठी प्रक्रिया शुल्कात कोणतीही सूट मिळणार नाही.

एसबीआयने कर्ज महाग केले

कोट्यावधी ग्राहकांना धक्का देत SBI ने कर्जाचे दरही महाग केले आहेत. वास्तविक बँकेने MCLR दर वाढवला आहे. त्यामुळे बँकेची सर्व गृहकर्ज आणि कार कर्ज महाग झाली आहे. बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, MCLR दर आता 8 टक्के ते 8.75 टक्क्यांच्या दरम्यान असेल. याआधी मार्च महिन्यातही SBI ने MCLR दर वाढवला होता.