Price of Jowar Sharp Rise: अतिवृष्टीमुळे या वर्षी सगळ्याच पिकांना फटका बसला. मिरची, ज्वारी, तुर या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव झाला. भाजीपाला पिकं सुद्धा रोगामुळे बेकार झाली. यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पेरणी कमी त्यात रोगांचा प्रादुर्भाव त्यामुळे उत्पादनात घट (Decrease in production)झाली आहे. उत्पादनात घट म्हणजे महागाई वाढणार. भाजीपाल्याचे दर तर वाढले आहेतच आता ज्वारी बाजरी सुद्धा वाढणार असल्याच्या आंदज वर्तवला जात आहे. ज्वारीच्या एकूण क्षेत्रापैकी 64 टक्के क्षेत्र पेरणी झाली असल्याने उत्पन्नात घट होऊन ज्वारी महागणार आहे.
राज्यात ज्वारीचे क्षेत्र किती? (What is the area of Jowar in the state?)
राज्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र 17 लाख 36 हजार 286 हेक्टर आहे. त्यापैकी 11 लाख 4 हजार 550 हेक्टर इतकी पेरणी झालेली आहे म्हणजेच 64 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ज्वारी शरीरासाठी पोषक असल्याने मागणी भरपूर प्रमाणात आहे, परंतु आवक कमी असल्याने त्याचे दर अधिक वाढतील असा अंदाज आहे. दसरा झाला की ज्वारीची आवक सुरू होते, पण पावसामुळे ज्वारीचे नुकसान झाले.
ज्वारीचे सध्याचे दर (Current rates of Jowar)
ज्वारी | आवक | दर |
ज्वारी - मालदांडी नं 1 | 564 | 5000 ते 5500 |
ज्वारी - मालदांडी नं 2 | 387 | 4000 ते 4700 |
ज्वारी - वसंत नं 9 | 416 | 3400 ते 4000 |
ज्वारी - दुरी | 364 | 3800 ते 4100 |
रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र (Area under rabi season crops)
रब्बी हंगामातील पिकांचे राज्यातील एकूण क्षेत्र 54 लाख 36 हजार 286 हेक्टर इतके आहे. त्यापैकी 38 लाख 36 हजार 375 हेक्टर पेरणी पूर्ण झाली झाली आहे म्हणजेच 70.66 टक्के पेरणी पूर्ण झाली. त्यापैकी 47.21 टक्के गहू आणि 89. 27 टक्के क्षेत्र हरभरा यांनी व्यापले आहे.
रब्बी ज्वारी | 63.62 |
गहू | 47.21 |
मका | 71.30 |
हरभरा | 89.27 |
रब्बी तेलबिया | 55.35 |