Higher Interest Rates Post Office Schemes: गुंतवणूकदार नेहमी गुंतवणूक करण्यास सुरक्षित पर्याय शोधत असतात. मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु मार्केटमध्ये सुरु असलेल्या सततच्या चढ-उतार मुळे आपले नुकसान होऊ नये, यासाठी गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधून पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीच्या योजना या गुंतवणूक करण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत, ज्या बँक एफडीपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. तसेच या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास कर लाभही मिळतात.
Table of contents [Show]
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना
पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास 7.7 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत एकरकमी पैसे गुंतवून 5 वर्षांनंतर निश्चित आणि सर्वाधिक परतावा मिळवू शकता. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांची कर सवलत (Tax Free) मिळवता येते.
सुकन्या समृद्धी योजना
जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तेव्हा सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर या योजनेत गुंतवलेल्या पैशावर 8 टक्के व्याज मिळते. यामध्ये केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात तुमची बदली झाल्यास हे खाते ट्रान्सफर करावे लागते.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, 5 वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कर सूट मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिकांना योग्य वेळी फिक्स परतावा देणारी योजना पाहिजे असते. तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला 8.2 टक्के दराने व्याज मिळते.