Social Media Influencer: गेल्या काही वर्षात सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर्स सक्रिय झाले आहेत. काही मिलियन्समध्ये फॉलोवर असणारे अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स रील्स, यूट्यूब शॉर्ट्स किंवा अगदी फेसबुक व्हिडिओ आणि पोस्ट्स वरून कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन(Brand Promotion) करून लाखो रुपये कमावत आहेत. याच इन्फ्लुएन्सर्ससाठी चुकीचे किंवा बनावट प्रमोशन करणे यापुढे महागात पडू शकते. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांवर म्हणजेच इन्फ्लुएन्सर्सवर(Social Media Influencer) कारवाई केली आहे आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. यामध्ये भरीव दंडाचीही तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
नियमांचे उल्लंघन केल्यास 50 लाखांचा दंड
अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनच्या(FTC) धर्तीवर भारत सरकारने(Indian Government) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हे नियम आणि अटी(Terms & Condition) पाळणे इन्फ्लुएन्सर्सची जबाबदारी असणार आहे. ब्रँड प्रमोशन(Brand Promotion) करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना ब्रँडशी त्यांचे संबंध उघड न केल्याबद्दल 50 लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम रील, फेसबुक किंवा यूट्यूब व्हिडिओमध्ये एखाद्या ब्रँडची जाहिरात केली, त्याबद्दल कोणतीही दिशाभूल करणारी माहिती दिली, तर त्याला ब्रँडच्या किंमतीनुसार किंवा ग्राहक कायद्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे.
ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे
- नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जे इन्फ्लुएन्सर्स लोकांना आर्थिक सल्ला(Financial Consulting) देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात अशा आर्थिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या कक्षेत येणार आहेत
- सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांची माहिती चुकीची आढळल्यास त्यांच्यावर 50 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येऊ शकतो
- इन्फ्लुएन्सर्सनी एखाद्या ब्रँडचा प्रचार(Brand Promotion) केला, तर त्यांना तो सार्वजनिक करावा लागणार आहे
- सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या दर्शकांना त्यांच्या ब्रँडशी असलेल्या संबंधांबद्दल माहिती देणे गरजेचे असणार आहे
- जर ब्रँड प्रमोशनसाठी पैसे दिले असतील किंवा इन्फ्लुएन्सर्सला एखादे उत्पादन, भेटवस्तू किंवा सवलत दिल्यास, या वस्तुविनिमय प्रणालीचीही माहिती देखील द्यावी लागणार आहे
सर्वसामान्यांना होईल फायदा
सरकारच्या या मार्गदर्शक तत्त्वांमुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. यूट्यूब(You tube) किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ब्रँडबद्दल दिलेली माहिती सामान्य लोक सत्य म्हणून स्वीकारतात असतात असे अनेकदा दिसून येते. समोरची व्यक्ती त्याच्या अनुभवाच्या आधारे खरे बोलत असावी असे ते गृहीत धरून बऱ्याच वेळा सर्वसामान्य लोक त्या उत्पादनाची खरेदी करतात. संपूर्ण भारतात सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्यांबाबत तरतूद करण्यात आली आहे, मात्र भारतात यासंदर्भात कोणतीही व्यवस्था नव्हती. सरकारचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याने यामुळे दिशाभूल किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. यामध्ये ग्राहकांचेही नुकसान होण्यापासून टाळले जाईल.