Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Social Media and Youth: सोशल मीडिया अॅप्सचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

Social Media Affects Youth

सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असून विविध पातळ्यांवर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, हे मानसशास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील ध्यान भरकटले असून इतर गोष्टींमध्ये त्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

अमेरिकेतील सियाटल येथील एका शाळेने सोशल मीडिया कंपन्यांविरोधात जिल्हा कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. गुगल, फेसबुक, अल्फाबेट टिकटॉक यासह इतरही कंपन्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी या कंपन्या जबाबदार असल्याचं याचिकेत म्हटले आहे. जनहीत याचिकेद्वारे शाळेने नुकसानभरपाई मागीतली असून या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत असून विविध पातळ्यांवर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, हे मानसशास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील ध्यान भरकले असून इतर गोष्टींमध्ये त्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अॅप्सचा तरुण, विद्यार्थी रात्रंदिवस वापर करतात. या अॅप्सवरील कंटेट अशा पद्धतीने बनवला गेला आहे की, तो तुम्हाला बराच वेळ अॅप्सवर रेंगाळत ठेवेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच दाखवल्या जातात. तसेच तुमच्या आवडीनिवडी बदलण्याची क्षमताही सोशल मीडियामध्ये आहे.

न्यूनगंड निर्माण होतो -

आर्थिक सामाजिक दरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. समाजातील दर्जा, उत्पन्न, रहाणीमान, कौटुंबिक स्थिती प्रत्येक मुलाची वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. त्यातून नैराश्य येते. भौतिक वस्तू कोणत्या आहेत त्यावरून तुलना केली जाते. जसे, की, मोबाईल, कपडे, गाडी, घर. विद्यार्थी अभ्यास सोडून या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यास लागतात. पैशांमुळेच या गोष्टी मिळू शकतात, हे समजल्यामुळे चोरी, दरोडे, हिंसाचार अशा घटना विद्यार्थ्यांकडून घडतात. चोरी करून मिळालेल्या पैशांतून मुलांनी पार्टी, महागड्या वस्तू खरेदी केल्याच्या कितीतरी घटना आपण पाहतो.

हिंसाचार -

सोशल मीडिया अॅप्सवर हिंसाचार, बलात्कार, धार्मिक तेढ निर्माण करणारा तसेच अश्लील कंटेट असतो. यामुळे विद्यार्थी वाममार्गाला लागतात. त्यांच्यामध्ये वैचारिक बदल लवकर घडतात. शारीरिक मानसिक विकास झाला नसल्याने या गोष्टींची कशा पद्धतीने समायोजन करावे त्यांना समजत नाही. त्यामुळे विद्यार्थीदशेत खून, मारामाऱ्या, लैंगिक अत्याचार अशा घटना वाढत आहेत.

मानसिक स्थिती ढासळते

सोशल मीडिया अॅप्सवर तासंतास वेळ घालवल्याने अनेकांची मानसिक स्थिती ढासळते. खूप वेळ मोबाईलवर रिल्स आणि व्हिडिओ गेम्स खेळून अनेक मुलांची मानसिक स्थिती बिघडल्याचे उदाहरणे समोर आली आहेत. अनेकांना मानसोपचार तज्ज्ञ किंवा वैद्यकीय मदतीची गरज पडते. लक्ष केंद्रीत न होणे, विचार करण्याची क्षमता कमी होते. विविध प्रकारचे आजारही यातून जडतात. पालकांनाही मुलांकडे सतत लक्ष देण्यास वेळ नसल्याने परिस्थिती आणखी बिकट होते. यामध्ये मुले वाहवत जातात. पालकांच्या लक्षात येईपर्यंत काहीतरी अर्थही घडलेला असतो. अनेक विद्यार्थ्यांनी यातून आत्महत्या देखील केल्या आहेत.

सोशल मीडिया क्षेत्रातील बड्या कंपन्यांचा नफा मिळवणे हा प्राथमिक उद्देश असतो. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. ग्राहकांनी आपल्या सेवेचा वापर करण्यासाठी विविध फिचर्स आणली जातात. तरुण मुले, मुली विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी या अॅप्सची रचना आणि कंटेटची निर्मिती विशिष्ट पद्धतीने केली जाते. हे रोखण्यासाठी पालक विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच सरकारी पातळीवर धोरण आखण्याची गरज आहे.