तुम्हाला तुमच्या कार विम्याचं नूतनीकरण करायचं आहे का? मग हे नूतनीकरण करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यासंबंधीचे कायदे आहेत. त्याचा विचार करावा लागेल. विमा तुम्ही कार विम्याचं वेळेवर नूतनीकरण करावं लागेल. विमा वैध (legal) आहे की नाही, सुरू केल्यानंतर काही कायदेशीर किंवा आर्थिक अडचणी येणार नाहीत ना, या सर्व बाबी विम्याचं ऑनलाइन नूतनीकरण (Renew) करताना पहाव्या लागणार आहेत. विम्याचं नूतनीकरण करताना आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पैसे वाचवणं. कशा पद्धतीनं या सर्व प्रक्रिया पार पाडाव्या, याविषयी आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत. कार विमा नूतनीकरण करताना याचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो.
Table of contents [Show]
कार विमा नूतनीकरणासाठी उपयुक्त टिप्स
1. वेळेवर नूतनीकरण करावं
कार विम्याचं वेळेवर नूतनीकरण करणं गरजेचं आहे. विम्याचं पॉलिसीचं नूतनीकरण वेळेपूर्वी केल्यास, प्रीमियम पूर्ण वर्षासाठी लॉक केला जातो. सुरू असलेल्या पॉलिसीची मुदत झाल्यानंतरच नूतनीकरण केलेल्या पॉलिसीचं कव्हरेज सुरू होईल. त्यामुळे विमा संरक्षणामध्ये कोणतंही अंतर राहणार नाही. मिळणारे फायदेदेखील अबाधित राहतील. विमा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगल्या योजना आहेत. त्यातल्या कोणत्या योजना आपल्यासाठी योग्य आहेत, त्याचा विचार करून निर्णय घ्यावा.
2. अॅड-ऑन कव्हरचा विचार आवश्यक
कार विम्याचं नूतनीकरण करण्याआधी बेस प्लॅनसोबत जोडलेल्या अतिरिक्त कव्हरचा विचार करा. अॅड ऑन कव्हरचा पर्याय आधी तुम्ही निवडला असेल जो त्यावेळी तुम्हाला महत्त्वाचा वाटला. मात्र जेव्हा कार विम्याचा विचार होतो त्यावेळी त्यातल्या अतिरिक्त फायद्याचाही विचारही करायला हवा. प्रत्येक अॅड-ऑन कव्हर महत्त्वाचे असतेच असं नाही. उपयुक्त तेच घ्यावं. त्यामुळे विम्याचा प्रीमियम कमी करण्यास मदत होईल.
3. मॉडिफिकेशन टाळा
कार खरेदी केल्यानंतर काही काळानंतर आतील किंवा बाहेरच्या भागाचं काही जण मॉडिफिकेशन करतात. निःसंशय त्यामुळे आपल्या कारला एक चांगला लुक मिळतो. मात्र अशाप्रकारचे बदल आपल्याला अधिक खर्चात टाकतात, हे जाणून घेऊनच मॉडिफिकेशन करावं. कारण मॉडिफिकेशनमुळे विम्याचं मूल्यही अतिरिक्त द्यावं लागतं. संबंधिक भागाचा दुरुस्ती खर्च अतिरिक्च असतो. त्यामुळे तुम्हाला प्रिमियमही अतिरिक्त द्यावा लागू शकतो.
4. आयडीव्ही पाहणं महत्त्वाचं
विमा कंपनीनं पॉलिसीधारकाला दिलेली कमाल रक्कम यालाच विमा उतरवलेलं घोषित मूल्य (Insured Declared Value) म्हटलं जातं. कारचं नुकसान झालं असेल किंवा कारचोरी झाली असेल तर पॉलिसीधारकाला रक्कम दिली जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर आयडीव्ही ही कार विम्याची रक्कम आहे. कारचं सध्याचं मूल्य काय हे विचारात घेऊन ते निश्चित केलं जातं आणि त्यानंतर घसारा घटक लागू केला जातो. हे घोषित मूल्य निवडणं महत्त्वाचं आहे. यामुळे जास्त कार विमा प्रीमियम भरणं टाळण्यास याद्वारे मदत होईल. यासोबतच वाहनाचं एकूण नुकसान किंवा चोरीमुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानापासून संरक्षण मिळतं.
5. नो क्लेम बोनस वापरणं
तुमच्याकडे क्लेम-मुक्त वर्ष असेल तर याचा अर्थ तुम्ही नो क्लेम बोनससाठी पात्र आहात. नॉन क्लेम बोनस (A non claims bonus-NCB) प्रत्येक वर्षी कमाल मर्यादेच्या 50 टक्के पोहोचेपर्यंत जमा होते. संचित एनसीबी वापरणं चांगलं आहे. कारण हे कार विमा प्रीमियम कमी करण्यास फायद्याचं ठरेल. सर्व कार पॉलिसीधारकांसाठी एक महत्त्वाची टिप म्हणजे छोटे छोटे क्लेम टाळणं. छोट्या दुरुस्तीवर जेवढा खर्च कराल, त्यापेक्षा संचित एनसीबी जास्त फायदा देते.
6. अँटी-थेफ्ट डिव्हाइस-टूल्सचा वापर करावा
अँटी थेफ्ट टूल्स म्हणजेच चोरीपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान वापरणं. अँटी थेफ्ट टूल्स इन्स्टॉल केल्यामुळे आपल्या वाहनाची सुरक्षितता अधिक मजबूत होते. अशा टूल्सच्या वापरामुळे विमा कंपनी कारच्या विमा प्रीमियमवर सूट देखील देत असते. अँटी-थेफ्ट डिव्हाइस ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियानं प्रमाणित केलेली असायला हवीत. अशी उपकरणं कार चोरीची शक्यता फारच कमी करतात.
7. ऐच्छिक कपातीची माहिती घ्यावी
ऐच्छिक काही कपात होणार असेल तर त्याविषयी किमा कंपनीकडून माहिती घ्या. वजावटीच्या संदर्भात विमा कंपनीकडे तपासा. कारण प्रत्येक क्लेमसाठी तुम्ही रक्कम भरत असता, त्या तुलनेत विमा कंपनी तुम्हाला देय असलेला कार विमा प्रीमियम कमी करेल. अर्थात क्लेमची रक्कम कमी केली जाते, त्यामुळे हे सर्व करताना जबाबदारीनं आणि हुशारीनं पर्याय निवडावा.
कोणतंही नुकसान हे सांगून होत नसतं. कधी अपघातामुळे, चोरी किंवा इतर काही कारणानं कारचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वेळेवर कोणतीही गोष्ट करण्याऐवजी आधीच खबरदारी घेतल्यास होणारं नुकसान कमी प्रमाणात होईल, त्याची भरपाई मिळेल. वैध ड्रायव्हिंग लायसन्स, पीयूसी, गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक जवळ बाळगावा. या सर्व स्मार्ट टिप्सचा वापर करा आणि पैसे वाचवा.