Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Renew Car Insurance: कारचा इन्शुरन्स रिन्यू करणार आहात? कोणती पॉलिसी तुमच्यासाठी चांगली, जाणून घ्या

Renew Car Insurance

Renew Car Insurance: कार इन्शुरन्स रिन्यू करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. यामध्ये एका वर्षा विरुद्ध अनेक वर्षासाठी इन्शुरन्स घेताना कोणते फायदे मिळतील हे जाणून घेऊयात.

तुमच्याकडेही कार असेल किंवा तुम्हीही कार चालवत असाल, तर तुम्हाला कारच्या इन्शुरन्सची (Car Insurance) आवश्यकता नक्कीच माहीत असेल. केवळ पोलिसांचे चलन टाळण्यासाठी कारचा इन्शुरन्स गरजेचा नसून अपघात किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास कार इन्शुरन्स मदतीला येतो. तथापि, हा इन्शुरन्स खरेदी करणं वाटत तेवढं सोपं नाही. तुम्ही नवीन वाहनाचा इन्शुरन्स खरेदी करत आहात की, जुन्या वाहनाचा इन्शुरन्स रिन्यू (Car Insurance Renew) करणार आहात, यामध्येही अनेकांचा सऱ्हास गोंधळ उडतो. त्यामुळे कारचा इन्शुरन्स रिन्यू करताना कोणती पॉलिसी तुमच्यासाठी चांगली ठरू शकते हे जाणून घेणे गरजेचे आहे. ते कसे, चला पाहूयात.

कार इन्शुरन्स रिन्यू करताना काय प्रश्न पडतात?

कार इन्शुरन्स रिन्यू (Car Insurance Renew) करताना अनेक प्रश्न डोक्यात घोंघावत असतात. या प्रश्नांमुळे लोकांचा गोंधळ उडतो, ज्यामुळे निर्णय घेणे अधिक कठीण होऊन बसते. ते प्रश्न नक्की कोणते जाणून घ्या.

  • कोणती पॉलिसी सर्वात चांगली? 
  • एक वर्षाची स्कीम (Single Year Insurance Scheme) खरेदी करावी की जास्त वर्षांसाठी एकदाच पैसे गुंतवावेत?
  • अनेक वर्षाची स्कीम (Multi Year Insurance Scheme) विकत घेतल्यानंतर अडकून तर पडणार नाही ना?

एक वर्ष विरुद्ध अनेक वर्षाचा कार इन्शुरन्स

सगळ्यात पहिल्यांदा आपण अनेक वर्षांच्या स्कीमबद्दल (Multi Year Insurance Scheme) म्हणजे अनेक वर्षांच्या धोरणाबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. यामध्ये दरवर्षी इन्शुरन्स रिन्यू करण्याची गरज नसते. तसेच दरवर्षी पैसेही खर्च करावे लागत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त वाहने असतील, तर त्याच्या तारखा, पैसे, कागदपत्रं अशा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. याउलट या सर्व गोष्टी एका वर्षाच्या स्कीमध्ये लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे अनेक वर्षासाठी कार इन्शुरन्स घेणं केव्हाही चांगलं.

पैशांची होईल बचत-

अनेक वर्षाची स्कीम घेण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे महागाई सातत्याने वाढत असून सर्वच वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत. एक वर्षाची पॉलिसी खरेदी करणे म्हणजे कार इन्शुरन्ससाठी दरवर्षी नवीन किंमत भरणे, कारण इन्शुरन्स कंपनी दरवर्षी दर सुधारित करते. तथापि, अनेक वर्षाच्या पॉलिसीच्या बाबतीत, सध्याचा दर संपूर्ण कालावधीत सारखाच राहतो. म्हणजेच तुम्ही अनेक वर्षांचा प्लान विकत घेऊन पैसेही वाचवू शकता.

एका वर्षाच्या पॉलिसीचा फायदा काय?

एका वर्षाच्या पॉलिसीमध्ये (Single Year Insurance Policy) एक गोष्ट सर्वात महत्त्वाची असते, ती म्हणजे एक वर्षाची पॉलिसी स्वस्त असते. कारण इथे पैसे एका वेळी फक्त एका वर्षासाठीच भरावे लागतात. तर याउलट अनेक वर्षाचा पॉलिसी प्रीमियम 2 किंवा 3 वर्षांसाठी भरावा लागतो. अशा परिस्थितीत, एक वर्षाची स्कीम खरेदी केल्यानंतर पैसेही कमी भरावे लागतात.

एक वर्षाच्या कार पॉलिसीचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला एक वर्षानंतर इन्शुरन्स कंपनी बदलण्याचे स्वातंत्र्य असते. जर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीची सेवा आवडली नाही, तर तुम्ही पुढील वर्षी इन्शुरन्स कंपनी बदलू शकता. याउलट अनेक वर्षांच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी कंपनी आणि तिच्या सेवेशी बांधील राहावे लागते. त्यामध्ये कोणतीही तडजोड करता येत नाही.