Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Repo Rate Hike: 12 महिन्यात कर्जदात्यांना सलग सहा झटके; रेपो रेट 6.50 टक्क्यांवर

RBI Repo Rate Hike

Repo Rate Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी (दि. 8 फेब्रुवारी) रेपो दरामध्ये 0.25 बेसिस पॉईंटने वाढ केली. आरबीआयने सलग सहाव्यांदा व्याजदरवाढ केली.

Repo Rate Hike: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बुधवारी रेपो दराममध्ये 0.25 बेसिस पॉईंटने वाढ करून कर्जदात्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. आरबीआयने रेपो दर आता 6.50 टक्के इतका झाला आहे. तो पूर्वी 6.25 टक्के होता. या व्याजदर वाढीमुळे पुन्हा एकदा ग्राहकांची कर्जे महागण्याची शक्यता आहे. तर कर्जदात्यांच्या ईएमआयमध्ये (EMI Hike) वाढ होऊ शकते.

2022-23 या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून आरबीआय महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत होती. पण त्यात आरबीआयला अपेक्षित यश येत नव्हते. यास अनेक गोष्टी कारणीभूत असल्याने आरबीआयने या आर्थिक वर्षात मॉनेटरी पॉलिसी कमिटी (Monetary Policy Committee)च्या एकूण 8 बैठका झाल्या. या 8 बैठकीत एमपीसीने 6 वेळा व्याजदरात वाढ केली. ही वाढ एकूण 2.50 टक्के इतकी झाली आहे. यामुळे खाजगी आणि सरकारी दोन्ही बॅंकांनी वेळोवेळी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. परिणामी ग्राहकांना वर्षभरात याचा 6 वेळा भुर्दंड सहन करावा लागला आहे. बॅंकांनी होमलोनसह सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढवले आहेत. यावेळी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

12 महिन्यात 2.50 टक्के रेपो दरात वाढ

2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल 2022 मध्ये रेपो दर (Repo Rate) 4 टक्के होता. त्यानंतर 4 मे 2022 रोजी रेपो दरात 0.40 बेसिस पॉईंटने वाढ केली. त्यानंतर 8 जूनमध्ये 0.50 बेसिस पॉईंट, 30 सप्टेंबरमध्ये 0.50 बेसिस पॉईंट,  7 डिसेंबरला 0.35 बेसिस पॉईंट आणि आता 8 फेब्रुवारीला 0.25 बेसिस पॉईंटने व्याजदरात वाढ केली. सरतेशेवटी सध्या आरबीआयचा रेपो दर 6.50 टक्के इतका झाला आहे.

2022 - 2023 Rise in Repo Rate Indian Governement Infographic

कर्जाची रक्कम किती आणि कशी वाढणार?

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर लगेच बॅंका आपल्या व्याजदरात वाढ करतील. यामुळे नकळतच नवीन कर्जदारांसाठी कर्ज महाग होईल आणि ज्यांचे कर्ज सुरू आहे. त्यांचा एकतर ईएमआय वाढेल किंवा त्यांच्या कर्जाच्या कालावधीत वाढ होईल. रेपो दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या ईएमआयवर कसा आणि किती परिणाम झाला, हे समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीने 2022-23 या आर्थिक वर्षात साधारणपणे एप्रिल 2022 मध्ये 30 लाख रुपयांचे होमलोन घेतले असेल. त्यावेळी त्याच्या कर्जाचा व्याजदर 6.7 टक्के होता असे आपण समजू. म्हणजे त्यावेळी 30 लाखांच्या कर्जावर त्याला 22,722 रुपये ईएमआय म्हणून भरावा लागत होता. त्यात आतापर्यंत 6 वेळा रेपो दरात वाढ झाली. ही वाढ एकूण 2.50 टक्के इतकी झाली. म्हणजे त्या व्यक्तीच्या होमलोनचा दर 6.7 टक्क्यांवरून 9.2 टक्के इतका झाला. तर या दरानुसार त्याचा ईएमआय 22,722 रुपयांवरून 27,379 रुपये होणार. म्हणजेच या 12 महिन्यात त्याच्या ईएमआयमध्ये 4,657 रुपयांची वाढ झाली.

रेपो दर वाढण्याचे कारण काय?

देशाचा किरकोळ महागाई दर गेल्या काही महिन्यांपासून सतत 6 टक्क्यांच्या वर होता. तो आरबीआयने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक होता. त्यात महागाई दिवसेंदिवस वाढत होती. सध्या महागाई दर आटोक्यात आहे; पण जगभर सुरू असलेल्या जागतिक मंदीच्या बातम्यांमुळे आरबीआय सावध पवित्रा घेऊन ठोस उपाययोजना करण्याचा विचार करत आहे. अनेक देशांमधील मोठमोठ्या कंपन्यांनी खर्च आटोक्यात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयची पतधोरण समिती रेपो दरात वाढ करण्याच्या सूचना करत असते.

आरबीआयची पतधोरण समिती काय आहे?

रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती (Monitary Policy Committee) रेपो दरात कपात किंवा वाढ करण्याची सूचना वेळोवेळी करत असते. या समितीचे प्रमुख / अध्यक्ष हे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das, RBI Governor) आहेत. त्यांच्यासोबत इतर 5 सदस्य या समितीत आहेत.