Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Loan: पर्सनल लोन नक्की कधी घ्यावं? 'या' 7 कामांसाठी पैशांची गरज होईल पूर्ण

Personal Loan

वैयक्तिक कर्ज योग्य वेळी घेतलं तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. मात्र, ही योग्य वेळ कोणती ते आपण या लेखात पाहू. आणीबाणी किंवा पैशांची गरज कधी लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. अचानक उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन हा एक पर्याय आहे.

Personal Loan: वैयक्तिक कर्ज योग्य वेळी घेतलं तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. मात्र, ही योग्य वेळ कोणती ते आपण आज या लेखात पाहू. आणीबाणी किंवा पैशांची गरज कधी लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यासाठी पर्सनल लोन हा एक पर्याय आहे. (When to apply personal loan) जलद कर्जही मिळते आणि प्रक्रियाही सोपी आहे. त्यामुळे मागील काही वर्षात पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

वैयक्तिक कर्ज असुरक्षित कर्ज श्रेणीत मोडते. म्हणजे बँक कर्ज देताना कोणतेही तारण ठेवत नाही. कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला कर्ज मिळून जाईल. गृह किंवा कार लोन घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. तसेच तुम्हाला तारण ही ठेवावे लागते. त्यामुळे पर्सनल लोनला पसंती मिळत आहे. 

पर्सनल लोन घेणे कधी योग्य ठरेल.

आरोग्यासंबंधित आणीबाणी (Medical emergency)

आरोग्यासंबंधित आणीबाणी तुम्हाला आर्थिक अडचणीत आणू शकते. तुमच्याकडे आरोग्य विमा असेल तर प्रत्येक वेळी आरोग्य विम्यातून सर्व खर्च भागवला जाईल असे नाही. आरोग्य विम्याचा दावा नाकारला गेला तर तुमच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे असे खर्च तुम्ही वैयक्तिक कर्जातून भागवू शकता. विना विलंब तुम्हाला पैसे मिळतील. तसेच अडचणीच्या काळात कोणापुढे हात पसरण्याची वेळही येणार नाही.

विवाहाचा खर्च 

भारतामध्ये विवाह हा एक मोठा सोहळा असतो. लग्नकार्यात किती रुपये खर्च होत आहेत, याकडे अनेकजण पाहतही नाहीत. मात्र, लग्नासाठीचे केटरिंग, शॉपिंग, हॉल बुकिंग, प्रि वेडिंग शूट यासह इतरही काही कारणांसाठी तुम्हाला पैशांची चणचण जाणवत असेल तर तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी असल्याने तुम्हाला लवकर कर्ज मिळेल. लग्नसोहळ्याच्या तयारीसाठी जास्त वेळ देऊन खर्चाच्या टेंशनपासून निश्चिंत राहू रहाल.

नव्या जागी राहायला जात असताना

नोकरी व्यवसाय किंवा इतर काही कारणांनी तुम्ही नव्या शहरात, नव्या जागी राहायला जाणार असाल तर अचानक खर्च वाढतो. जर घर भाड्याने घेत असाल डिपॉझिट, फर्निचर असे खर्च मध्येच उद्भवू शकतात. तसेच घराची डागडूजी, नवे फर्निचर असे खर्च नव्या ठिकाणी जाताना करावे लागू शकतात. सामानाच्या वाहतुकीचा खर्चही तुम्ही वैयक्तिक कर्जातून भागवू शकता.

अनियोजित ट्रिप किंवा पर्यटन

प्रवास कोणाला आवडत नाही. फिरायला जायचे नियोजन आधीपासून असेल तर त्यानुसार पैशांची व्यवस्था करता येते. मात्र, अचानक तुम्हाला प्रवास करावा लागला तर तिकिटापासून सर्वच खर्च वाढतात. कारण, ऐनवेळी बुकिंगसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. अनियोजित प्रवासाचे खर्च भागवण्यासाठी तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. हे कर्ज तुम्हाला काही तासांतही मिळू शकते. विमान प्रवास, काही आठवड्यांची ट्रिपचा खर्च भागवण्यासाठी पर्सनल लोन मदतीला येईल. 

घराचे नूतनीकरण

भारतामध्ये गृहविमा घेणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काही कारणांमुळे घराचे नुकसान होते तेव्हा हा खर्च तुम्ही पर्सनल लोनद्वारे भागवू शकता. तसेच जेव्हा तुम्ही घराचे नूतनीकरण सुरू करता तेव्हा नियोजित खर्चापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता जास्त असते. हा खर्च काही लाखांतही जास्त असून शकतो. तेव्हा हे पैसे तुमच्या कामाला येतील. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला 40 लाखापर्यंतही वैयक्तिक कर्ज एचडीएफसी बँकेकडून मिळू शकते.

मुलांच्या शिक्षणाचा खर्च (Kids’ education)

शिक्षणावरील खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, हा अत्यावश्यक खर्च असल्याने तो तुम्ही टाळू शकत नाही. मुलांची ट्युशन फी, एक्स्ट्रा क्लासेसचा खर्च तुम्ही पर्सनल लोन काढून भागवू शकता. विशेषत: मुले मोठी असतील तर महाविद्यालयीन शिक्षणाचा अचानक खर्च उद्भवू शकतो. अॅडमिशन घेतानाही अनेकवेळी शुल्काचा अंदाज येत नाही. अचानक कॉलेज, विद्यापीठ बदलल्यानंतर खर्चात मोठी वाढ होते. अशा वेळी तुम्हाला वैयक्तिक कर्ज कामी येईल.

गॅझेट उपकरणे विकत घेताना

तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे की तुम्ही नुकताच घेतलेला महागडा स्मार्टफोन जुना वाटू शकतो. घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा गॅझेट घेण्याचा खर्च तुम्ही पर्सनल लोनद्वारे भागवू शकता. गरज कोणतीही असू द्या वैयक्तिक कर्ज तुम्हाला मिळू शकते. मात्र, कोणतेही कर्ज घेताना तुमची गरज आणि कर्ज फेडण्याची क्षमता, कर्जावरील विविध शुल्क याची माहिती घेऊनच कर्ज घ्यावे, अन्यथा इएमआय भरताना नाकीनऊ येऊ शकतात. तसेच विलंब झाला तर क्रेडिट स्कोअरही खाली येऊ शकतो. अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना प्रिअप्रूव्हड पर्सनल लोनची ऑफर देतात.