Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment: 30 वर्षात 15 कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला किती मासिक बचत करणे आवश्यक आहे? जाणून घ्या

Mutual Fund Investment

SIP Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. परंतु मासिक गुंतवणूक हा पर्याय (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूकदारासाठी, गुंतवणूकीच्या कालावधीत दिलेल्या इक्विटी परताव्यामुळे अधिक सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेची काळजी करण्याची गरज नाही.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. परंतु मासिक गुंतवणूक हा पर्याय (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूकदारासाठी, गुंतवणूकीच्या कालावधीत दिलेल्या इक्विटी परताव्यामुळे अधिक सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेची काळजी करण्याची गरज नाही.

गुंतवणूक तज्ञांच्या मते दीर्घकालीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाचा 15 x 15 x 15 नियम माहित असणे आवश्यक आहे. या नियमानुसार चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. म्हणजेच  एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला 15 हजार रुपये गुंतवले तर 15 वर्षांनंतर एकूण रक्कम म्हणून 1 कोटी रुपये मिळतील. पुढील 15 वर्षे ही गुंतवणूक सुरू ठेवल्यास 10 कोटी रुपयांचा परतावा मिळेल.  वयाच्या 30 व्या वर्षी मासिक SIP मध्ये गुंतवणूक करत असेल, तर निवृत्तीच्या वेळी 15 कोटी जमा करणे शक्य आहे कसे ते जाणून घेऊया.

SIPचा वापर करून म्युच्युअल फंड गुंतवणूकीतून काही वर्षात 15 रूपये कोटी कसे जमा करायचे याविषयी , SEBI नोंदणीकृत कर आणि गुंतवणूक तज्ञ जितेंद्र सोलंकी म्हणाले, कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यापासून मासिक म्युच्युअल फंड SIP सुरू करणे आवश्यक आहे. जर कोणी वयाच्या 30 व्या वर्षी सुरुवात करत असेल, तर तो व्यक्ती पुढील 30 वर्षे गुंतवणूक करण्यासाठी पात्र असतो.

30 वर्षांत कशी होईल 15 कोटींची गुंतवणूक (How Will the Investment of 15 Crores Be Done In 30 years?)

म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटरनुसार, 30 वर्षांसाठी गुंतवलेल्या पैशावर 15% परतावा गृहीत धरल्यास, गुंतवणूकदाराला मासिक SIP सुरू करण्यासाठी प्रति 21,000  रुपयांची आवश्यकता असेल.  गुंतवणूकदाराचे मासिक बचतीद्वारे म्युच्युअल फंड SIP सुरू करून 30 वर्षांत 15 कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. 

SIP मध्ये ऑनलाइन गुंतवणूक कशी करावी (How to Invest Online In SIP)

 SIP गुंतवणूक ऑनलाइन सुरू करण्यासाठी स्टेप्स व आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड 
  • चेक बुक
  • पासपोर्ट  फोटो
  • पत्त्याचा पुरावा (तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत, युटिलिटी बिल किंवा बँक स्टेटमेंट)

तुमच्याकडे ही कागदपत्रे असल्यास तुम्ही SIP खाते ऑनलाइन उघडू शकता.

केवायसी करणे गरजेचे

म्युच्युअल फंड आणि युलिप फंड्समध्ये गुंतवणुकीसाठी एसआयपीमध्ये ऑनलाइन गुंतवणूक करण्यासाठी आधी केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी खालील माहिती गरजेची आहे.

  • नाव
  • जन्मतारीख
  • पत्ता
  • मोबाईल नंबर

ही केवायसी करणे एकदाच गरजेचे आहे. यानंतर माहितीत बदल न झाल्यास अपडेट करण्याची गरज नाही. यानंतर तुम्ही या फंडांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करु शकतात.

(डिसक्लेमर: शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)

Source - www.mint.com