Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

झुनझुनवाला गेले पण त्यांनी गुंतवणूक केलेला 'हा' शेअर घेतोय लक्ष वेधून, महिनाभरात मोठी झेप

Rakesh Jhunjhunwala

Singer India Stock Sharp Rise : भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. मात्र त्यांनी गुंतवणूक केलेल्या सिंगर इंडिया या शेअरने महिनाभरात केलेली घोडदौड थक्क करणारी आहे.सिंगर इंडियातील तेजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले असले तरी त्यांची गुंतवणूकीतील स्ट्रटेजी आजही अचूक आणि फायदेशीर ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शिलाई मशीनचा भारतातील सगळ्यात जुना ब्रॅंड असलेल्या सिंगर इंडिया हा शेअर मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 44% वाढला.  (Singer India Stock Sharp Rise in Two Session) काल मंगळवारी त्यात 20% अप्पर सर्किट लागले होते. महिनाभरात सिंगर इंडियाच्या शेअरने मोठी झेप घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सिंगर इंडिया या कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी काही दिवसांपूर्वी मोठी गुंतवणूक केली होती. राकेश झुनझुनवाला यांच्या RARE इन्व्हेस्टमेंट या कंपनीनं सिंगर इंडियाचे तब्बल 42,50,000 शेअर सरासरी 53.50 रुपयांना ब्लॉक डीलमधून खरेदी केले होते.सिंगर इंडियाच्या एकूण भाग भांडवलापैकी हे प्रमाण  10% हून अधिक आहे. ही बातमी जेव्हा शेअर मार्केटमध्ये पसरली त्यानंतर सिंगर इंडियाच्या शेअरला प्रचंड मागणी वाढली.

RIP Rakesh Jhunjhunwala : शेअर बाजारातले ट्रेडिंग किंग राकेश झुनझुनवाला यांचे निधन, जाणून घ्या पोर्टफोलिओ

अचानक सिंगर इंडियाचा शेअर चर्चेत आला आहे. शेअर मार्केटमध्ये मंगळवारी 16 ऑगस्ट 2022 रोजी सिंगर इंडियाचा शेअर 20% वाढला आणि त्याला अप्पर सर्किट लागले होते.बुधवारी 17 ऑगस्ट रोजी हा शेअर 79.00 रुपयांवर स्थिरावला. त्यात 14.24% वाढ झाली. तत्पूर्वी त्याने इंट्राडेमध्ये 82.50 रुपयांपर्यंत मजल मारली होती. शुक्रवारी 12 ऑगस्ट 2022 रोजी सिंगर इंडियाचा शेअर 57.65 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला होता.

मल्टीबॅगर ठरलाय सिंगर इंडिया (Multibagger Stock)

आकडेवारी नजर टाकली तर सिंगर इंडिया गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. मागील तीन वर्षात सिंगर इंडियाने 166% परतावा दिला. एक वर्षात तो 30% एक महिन्यात तो 95% वधारला आहे.

कर्जमुक्त आहे सिंगर इंडिया (Zero Debt) 

शिलाई मशीन या मुख्य उपकरणात कंपनीचा मोठा बिझनेस आहे. शिलाई मशीनचे सुटे भाग आणि अॅक्सेसरीज देखील सिंगर इंडियाकडून विक्री केली जाते. त्याशिवाय इलेक्ट्रिक कुलर, ज्युसर, मिक्सर, फॅन, ओव्हन यासारखी उपकरणे तयार केली जातात. सिंगर इंडियावर आजच्या घडीला कोणतेही कर्ज नाही.कंपनी कर्जमुक्त आहे. 30 जून 2022 अखेर कंपीना ९६ लाख रुपयांचा नफा झाला.महसुलात 49% वाढ झाली असून कंपनीला 109.53 कोटींचा महसूल मिळाला आहे.शिलाई मशीन आणि घरगुती उपकरणांच्या विक्रीत पहिल्या तिमाहीत चांगली वाढ झाली होती.जून अखेर कंपनीकडील मालाचा साठा देखील वाढला आहे.आगामी सणासुदीला विक्री वाढेल, असा कंपनी व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. 
 
Image Source : twitter