भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंड, सोन्यातील गुंतवणूक शेअर मार्केट यासह पांरपरिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे मुदत ठेवी. ज्या ठिकाणी चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यावर आपण भर देत असतो. वित्तीय क्षेत्रात नावाजलेल्या श्रीराम फायनान्सने (shriram Finance) नागरिकांसाठी उन्नती मुदत ठेव योजना (Unnati Jubilee fixed deposit scheme) सुरू केली आहे. ही योजना सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत. यामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करता येईल याबाबतची माहिती जाणून घेऊ..
श्रीराम उन्नती मूदत ठेव योजना
श्रीराम ग्रुपच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्रीराम फायनान्सने ज्युबिली डिपॉझिट्स म्हणजेच श्रीराम उन्नती मूदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना गुंतवणुकीवर जास्त व्याजदर दिला जात आहे. या योजनेची सुरुवात एप्रिल 2023 मध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या उन्नती मूदत ठेव योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि महिला गुंतवणूक दारांना अधिकचा व्याजदर दिला जात आहे.
किती आहे व्याजदर
श्रीराम फायनान्सच्या या उन्नती मूदत ठेव योजेनमध्ये 9.10% पर्यंत वार्षित व्याजदर दिला जातो. तसेच या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज दर दिला जातो तर महिलांसाठी फायनान्सकडून विशेष 0.10% अधिकचा व्याजदर दिला जात आहे. यासाठी फायनान्स कडून काही नियम अटी लागू केल्या आहेत. त्या तुमच्या मुदत ठेव योजनेनुसार लागू होतील. तसेच सर्व मुदत ठेवीवर नुतनीकरणावर अतिरिक्त व्याज 0.25%* वार्षिक व्याज दिले जाईल.
कालावधी किती?
मुदत ठेवी कमीत कमी 5000 रुपांपासून गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकीचा कालावधी हा एक वर्ष ते 5 वर्षापर्यंतचा राहिल. या मुदत ठेव योजनेसाठी नियम आणि अटी लागू आहेत. तुम्ही श्रीराम फायनान्सच्या https://www.shriramfinance.in/fixed-deposit-how-to-apply या संकेतस्थळावर मुदत ठेवीसाठी अर्ज करू शकता.