ट्रेकिंग हा एक साहसी खेळाचा प्रकार मानला जाते. याची पहिली पात्रता ही तुमचा साहसीपणा व जिगरबाजपणा. तुमच्यात तो नसेल आणि तुम्ही इतर सर्व गोष्टी पैशाने विकत घेणार असाल, तर तुम्ही या खेळाच्या वाटेला न गेललं बरं!
पण तुमच्यात साहसीपणा आणि जिद्द आहे; पण यासाठी लागणार खर्च करण्याची ऐपत सध्या नाही. तर आम्ही तुमच्यासाठी अशा काही ट्रिक्स आणल्या आहेत. ज्यामुळे तुमचा ट्रेक स्वस्तात मस्त होऊ शकतो. यामध्ये आपण प्रामुख्याने ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंग गिअर्स (Trekking Gears) विकत घेणे योग्य की भाड्याने, याबद्दल जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
ट्रेकिंग साहळी खेळ!
सर्वप्रथम आपण हे मान्य केलं आहे की, ट्रेकिंग हा साहसी खेळाचा भाग आहे. त्यामुळे ट्रेक करताना स्वत:ची काळजी घेणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये वैयक्तिक हेल्थ चेकअप किंवा जुने आजार याबद्दल जागरूक असणे गरजेचे तर आहेच. पण त्याचबरोबर ट्रेकिंगमध्ये कोणत्या गोष्टींचा त्रास होऊ नये. यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काही नियम कटाक्षाने पाळणे जितके गरजेचे आहे. तितकेच काही वस्तुंचा/घटकांचा वापर करणे गरजेचे आहे. अर्थात यासाठी पैसे खर्च करावे लागतात.
वैयक्तिक सुरक्षितता महत्त्वाची!
ट्रेकिंगला जाण्याचा आपण जेव्हा निर्णय घेतो. तेव्हा काही अंशी आपला जीव धोक्यात नेत आहोत. याची आपल्याला जाणीव असते. पण त्यासाठी आपण थोडेफार स्वत:च्या सुरक्षेसाठी पैसे खर्च करणे गरजेचे आहे. आता हे पैसे किती आणि कसे खर्च करायचे याबाबतच्या टीप्स आम्ही तुम्हाला नक्की सांगू शकतो. यामुळे तुम्ही सुरक्षित देखील राहू शकता आणि तुमच्यावर आर्थिक ताणही येणार नाही.
सर्वाधिक खर्च ट्रेकिंग गिअर्सवर
पावसाळा सुरू झाला की, रानावनात जशा कुत्र्यांच्या छत्र्या दिसू लागतात. तसेच तरुणांचे ग्रुप डोंगरदऱ्यातून ट्रेक करताना दिसू लागतात. सध्या तर ट्रेकचे फॅडच आले आहे. सोशल मिडियावर प्रत्येक दोन रिलच्या मागे एक रिल ट्रेकचा असतो. त्यामुळे जे कधीही ट्रेकला गेलेले नाहीत. त्यांचीही ट्रेकला जाण्याची इच्छा होते. यासाठी ते ट्रेकची बेसिक फी पैसे भरतात. त्यानंतर जिथून ट्रेक सुरू होणार आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या गाडी-घोड्यांचा वापर करून त्याच्यासाठी पैसे खर्च करतात. या दोन्हीपेक्षा त्यांचा सर्वाधिक खर्च हा ट्रेकिंगसाठी लागणारी पर्सनल गिअर्स खरेदी करण्यावर होतो.
वर्षातून एखाद-दुसरा ट्रेक करणाऱ्यांनी ट्रेकिंग गिअर्सवर भरमसाठ पैसे खर्च करण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याकडे साक्षरतेचा खूप अभाव आहे. म्हणजे आपल्या लोकांना लिहिण्या-वाचण्यातील साक्षरता अवगत झाली आहे. पण त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी अर्थ लावताना त्याचा वापरच केला जात नाही. आता आपण साक्षरतेच्या थोडे पुढे जाऊन डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, जीवनमूल्य साक्षरता या टप्प्यावर अडकलो आहोत. ट्रेकिंगच्या साक्षरतेबद्दल सांगायचे झाले तर आपल्याकडे अशा काही संस्था आणि स्टोअर्स आहेत. जे ट्रेकिंग गिअर्स भाड्याने देतात. यामुळे तुमचे बरेचसे पैसे वाचण्यात मदत होते.
ट्रेकिंग गिअर्स भाड्याने घेतल्यास नेमका काय फरक पडतो?
भाड्याने घेतल्यास खर्च कमी
ट्रेकिंग गिअर्सच्या किमती या स्वस्त नाहीत. त्यात तुम्ही ज्या वस्तू विकत घेणार आहात. त्याची क्वॉलिटी पाहणे गरजेचे असते. त्याबद्दल आपल्या पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे एखाद्या संस्थेकडून किंवा जाणकरांकडून चांगल्या दर्जाची साधने भाड्याने घेणे योग्य ठरू शकते. सर्व ट्रेकिंग गिअर्स भाड्याने घेतल्यास त्याच्या किमतीत तुम्ही एकच वस्तू विकत घेऊ शकता. त्यामुळे ट्रेकचा खर्च कमी करायचा असेल तर, त्यासाठी लागणारी साधने भाड्याने घ्या.
पूरक निर्णय घ्या
पूरक निर्णय म्हणजे तुम्ही वर्षातून एखाद-दुसरा ट्रेक करण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करून या वस्तू विकत घेणार. त्यानंतर त्या तशाच पडून राहणार. यामुळे तुमच्या पैशांचे मूल्य तर कमी होणार. पण त्याचबरोबर तुम्ही नियमित न वापरणाऱ्या गोष्टींमध्ये भर घालत आहात. याचा नकळत कुठे ना कुठे तरी विपरित परिणाम होत असतो. तो टाळण्यासाठी पूरक निर्णय घ्या.
उपकरणांची काळजी घ्यावी लागत नाही
ट्रेकिंगसाठी आपण जी साधने विकत घेतो. ती आठवड्याभराच्या ट्रेकनंतर अडगळीची वाटू लागतात. मग ती कुठेतरी धूळखात पडतात. त्यामुळे त्याची क्वॉलिटीसुद्धा खराब होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाड्याने घेतलेली साधने आठवडाभर वापरून लगेच देऊन टाकली आपली जबाबदारी संपते.
ट्रेकिंगच्या बजेटवर परिणाम होत नाही
पहिल्यांदाच ट्रेक करत असाल तर एकट्याने ट्रेक करणे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे ग्रुपसोबत किंवा अनुभवी लोकांसोबत ट्रेक करावा. पण त्यासाठी काही संस्था फी घेतात. त्याचबरोबर ट्रेक सुरू होणाऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करून तिथे पोहचावे लागते. त्यासाठीही पैसे खर्च होतात. हे दोन्ही खर्च न टाळता येण्यासारखे आहेत. अशावेळी ट्रेकिंग गिअर्स जर विकत घेण्याऐवजी भाड्याने घेतली तर बऱ्यापैकी बचत होऊ शकते आणि यामुळे तुमच्या ट्रेकिंगच्या बजेटवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.
ट्रेकिंग गिअरमध्ये काय-काय भाड्याने मिळते आणि ते कसे घ्यायचे?
ट्रेकिंग गिअर्समधील बऱ्यापैकी सर्व वस्तू भाड्याने मिळतात. याचे प्रामुख्याने 4 भाग पाडले, तर त्यात ट्रेकिंग अॅक्सेसरीज्, ट्रेकिंग शूज, ट्रेकिंग जॅकेट्स, ट्रेकिंग बॅकपॅकस् यांचा समावेश होतो.
ट्रेकिंग अॅक्सेसरीज् मध्ये रेन पॉन्चो. ट्रेकिंग ग्लोव्हज्, हेड टॉर्च, लेग गेटर्स, ट्रेकिंग पोल, मेन-वुमेन ट्रेक पॅण्ट, ट्रेकिंग सनग्लासेस, रेन पॅण्ट यांचा समावेश होतो.
ट्रेकिंग शूजमध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेकसाठी उपयुक्त असणाऱ्या शूजचा समावेश होतो. पावसळ्यातील ट्रेकसाठी वॉटरप्रूफ आणि चिखलात ग्रिप देणारे शूज वापरले जातात. तर डोंगरावर चढण्यासाठी किंवा पाय घोट्यापर्यंत सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळ्या शूजचा वापर केला जातो.
ट्रेकिंग जॅकेट्समध्ये रेन जॅकेट्स, मेन-वुमेन ट्रेक जॅकेट्स, वुमेन पार्का जॅकेट्स, मेन-वुमेन डाऊन जॅकेट्स, फ्लीज जॅकेट्स यांचा समावेश होतो.
तर ट्रेकिंग बॅकपॅकमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या आणि सामान वाहून नेण्याऱ्या वजनानुसार बँगपॅक मिळतात. अशाप्रकारे आपल्याला हव्या त्या वस्तू भाड्याने देणाऱ्या अनेक संस्था इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही लाभ घेऊन तुमची ट्रेक बजेटमध्ये एन्जॉय करू शकता.