TPA Insurance: आरोग्य विमा कंपनीकडून तुम्ही थेट विमा पॉलिसी खरेदी करू शकता. विम्याचे दावे निकाली काढण्यासाठी कंपनीची स्वत:ची इन हाऊस टीम असते. मात्र, काही वेळा विम्याचा दावा पास करण्याची प्रक्रिया थर्ड पार्टी कंपन्यांकडून पूर्ण केली जाते. या कंपन्या दावा मंजूर करण्यासाठी मदत करतात. अशा मध्यस्थी कंपन्यांना विमा नियामक संस्थेने परवानगी दिलेली असते.
TPA Insurance इन्शुरन्स कंपन्या कसे काम करतात?
TPA म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपनी. पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्यामधील दुवा म्हणून थर्ड पार्टी कंपनी काम करते. या कंपनीची स्वत: विमा प्रॉडक्ट नसतात. मात्र, बड्या विमा कंपन्यांच्या विमा पॉलिसी या थर्ड पार्टी कंपनीद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. देशातील आघाडीच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपन्यांची नावे तुम्हाला या लिंकवर पाहायला मिळतील.
ग्राहकांना विमा पॉलिसीसोबत अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. त्यामुळे ग्राहकही या कंपन्यांकडे आकर्षित होतात. मात्र, इर्डा अधिकृत थर्ड पार्टी कंपन्यांकडून सेवा घ्यावी. (What is TPA) रिलायन्स, टाटा, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आदित्य बिर्ला, डिजिट, मॅक्स, मनिपाल, बजाज यांसारख्या मोठ्या विमा कंपन्यांसाठी थर्ड पार्टी कंपन्या काम करतात.
क्लेम मिळवताना कशी मदत होते?
सर्वसामान्य नागरिकांना विमा पॉलिसीतील किचकट भाषा समजत नाही. जेव्हा क्लेम करण्याची वेळ येते तेव्हा अडचण निर्माण होते. त्यामुळे विम्याचा दावा मंजूर होण्यासाठी या कंपन्या मदत करतात. कॉर्पोरेट कंपन्यांना सुद्धा थर्ड पार्टी कंपन्यांद्वारे सेवा दिली जाते.
जर तुम्हाला TPA कंपनी रद्द करायची असेल तर तुम्ही करू शकता. विमा कंपनीशी जोडलेल्या दुसऱ्या TPA ची सेवा त्या बदल्यात मिळवता येईल. मात्र, विमा कंपनीशी संपर्क साधून तुम्हाला तशी मागणी करावी लागेल. विमा कंपनी दाव्याची कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम थर्ड पार्टी कंपनीकडे देऊन स्वत: इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करते.