अनेकांना टीडीएस (Tax Deducted at Source) कापल्यानंतर पगार मिळतो. अशा परिस्थितीत टीडीएस कपातीनंतर जो पगार मिळतो, त्यावरही कर कापला जाईल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. अनेकांना असेही वाटते की त्यांचा टीडीएस कापला तर आता त्यांना रिटर्न भरावा लागणार नाही. अशावेळी याचे नियम जाणून घेणं गरजेचं आहे. पगारावर कापलेला टीडीएस कर दायित्वानुसार मोजला जातो. त्यामुळे पगाराच्या व्यतिरिक्त व्याजाच्या उत्पन्नावरदेखील कर लागणार आहे. यामुळे तुम्हाला आयकर रिटर्न भरणं गरजेचं ठरतं. जर 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यावसायिक उत्पन्नावर टीडीएस कापला असेल, तर त्याच्या परताव्याच्या दाव्यासाठी आयटीआर भरणं गरजेचं आहे.
पगारावर टीडीएस कापला गेला तर...
जर तुमच्या पगारावर टीडीएस कापला गेला तर तुमचा कर जितका होईल तितकाच तो कापला जाईल. मात्र यानंतरही तुम्हाला रिटर्न फाइल करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुमच्या एम्प्लॉयरनं तुमच्याकडून टीडीएस कापला असेल, तर तुम्हाला रिटर्न भरण्याची गरज नाही, असा विचार करणं चुकीचं आहे.
एफडी किंवा इतर उत्पन्न?
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, असं होऊ शकतं की जेव्हा तुमच्या पगारातून टीडीएस कापला गेला तर त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही बचतीवर व्याज, एफडी किंवा इतर कोणत्याही उत्पन्नावर व्याज असू शकतं, ज्यावर बहुतेक 10 टक्के कर कापला जाऊ शकतो. मात्र जर तुम्ही 20 टक्के किंवा त्याहून अधिकच्या ब्रॅकेटमध्ये आलात तर तुम्हाला उर्वरित कर भरावा लागणार आहे. म्हणून बहुतेक केसेसमध्ये, जर तुमच्याकडे एफडी किंवा इतर उत्पन्न असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार आहे.
अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्नावर रिटर्न
जर तुमचं उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असेल, परंतु तुम्ही कुठेतरी सल्लागार किंवा व्यावसायिक म्हणून काम करत असाल, तर अशा परिस्थितीत तुमचा 10 टक्के कर कापला जात आहे, या प्रकरणात तुमचा कर भरला जात नाही, परंतु तुम्हाला परतावा मिळवण्यासाठी रिटर्न फाइल करावं लागेल. अन्यथा तुम्हाला परतावा मिळणार नाही.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            