आधी गुंतवणूक म्हटली की काही ठरावीक पर्याय उपलब्ध होते. मात्र, आता गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे गुंतवणुकदार आपल्या परीने गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. त्यातही ज्या गुंतवणुकदारांना मोठा फंड जमा करायचा आहे. ते बहुतेक करुन, दीर्घ मुदतीची गुंतवणूक करतात. तर काही जण अल्प मुदतीच्या गुंतवणुकीला निवडतात. अल्प मुदत म्हटल्यावर त्याच्या नावावरुनच आपल्याला अंदाज येतो. या ठिकाणी गुंतवणूक करायचे म्हटल्यावर, 3 महिने ते 1 वर्षापर्यंत मुदत राहते.
Table of contents [Show]
अल्प मुदतीसाठी का करावी गुंतवणूक?
अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करायचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्हाला पैशांसाठी जास्त वाट पाहायला लागत नाही. तसेच, त्याची डिझाईन कमी अवधीत जास्त रिटर्न मिळावा अशीच केलेली असते. विशेष म्हणजे अधिक रिटर्न मिळवण्यासाठी गुंतवणुकदारांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत नाही.
त्यामुळे काही महत्वाच्या आणि नजीकच्या खर्चाच्या उद्देशाने अल्प मुदतीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यात येते. तसेच, या ठिकाणी पैसा गुंतवल्यास रिस्क ही कमी राहते. याशिवाय अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या तुलनेत या ठिकाणी तुम्ही कधीही पैसे काढू शकता. त्यामुळे अल्प मुदतीचे पर्याय गुंतवणुकीसाठी खास आहेत.
फिक्स्ड डिपाॅझिट (FD)
बॅंकेत एका वर्षासाठी एफडी उघडणे हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. तसेच, बॅंकेत एफडी केल्यावर तुम्ही कधीही पैसे काढू शकता आणि बॅंक एफडीवर आकर्षक व्याज ही देते. अल्प मुदतीचा पर्याय निवडण्यासाठी गुंतवणुकदार 3 महिने ते 1 वर्षाच्या मुदतीसाठी एफडीचा पर्याय निवडू शकतात.
रिकरिंग डिपाॅझिट(RD)
रिकरिंग डिपाॅझिट गुंतवणुकीचा चांगला पर्याय असून तुम्ही बॅंकेत किंवा अन्य ठिकाणी आरडी उघडून चांगले रिटर्न मिळवू शकता. या ठिकाणी गुंतवणुकदार महिन्याला, तिमाही आणि अर्ध-वार्षिक पेमेंटच्या पर्यायांसह गुंतवणूक करु शकतात. म्हणजेच गुंतवणुकदार एक रक्कम निवडून या पद्धतीने गुंतवणूक करु शकतात. त्यामुळे महिन्याला एक ठरावीक रक्कम भरणे भारी जात नाही. तसेच, कमी अवधीत चांगले रिटर्न मिळायला मदत होते.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (POTD)
गुंतवणुकदारांसाठी पोस्टातील टाईम डिपाॅझिटही चांगला पर्याय आहे. या ठिकाणी एका वर्षासाठी गुंतवणुकदारांना 6.90 टक्के व्याजदर मिळतो. पण, एकदा तुम्ही पैसे टाकल्यानंतर ते टाकले त्या दिवसापासून 6 महिन्यांनंतर काढत येतात. त्यामुळे गुंतवणूक करण्याच्या आधी ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
सोने-चांदी
पूर्वीपासूनच सोन्यात आणि चांदीत पैसा गुंतवणे सर्वात बेस्ट पर्याय मानला जातो. यात तुम्ही अल्प मुदतीसाठी किंवा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करु शकता. म्हणजेच सोन-चांदी विकत घेऊ शकता. कारण, यांच्या दरात सातत्याने वाढ होत राहते. त्यामुळे चांगला रिटर्न मिळू शकतो. तसेच, तुम्हाला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ते सहज विकून तुम्ही चांगले पैसे मिळवू शकता.
अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करणे कधीही फायद्याचेच आहे. कारण, कमी अवधीत तुम्हाला चांगले रिटर्न मिळणार आहेत. तसेच, काही महत्वाच्या अडीअडचणींसाठी हे पैसे लगेच काढता येणार आहेत. त्यामुळे याचा वापर करुन तुम्ही तुमच्या नजीकच्या आणि महत्वाच्या गरजा पूर्ण करु शकता.