Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Myntra Big Fashion Sale मध्ये खरेदी करा आणि मिळवा 90% पर्यंत सूट, 6 हजार फॅशन ब्रांड होणार सहभागी

Myntra Big Fashion Sale

Myntra ने सेलची तारीख जाहीर केली नसली तरी, या सेलमध्ये ग्राहकांना काय काय खरेदी करता येणार आहे याची कल्पना दिली आहे. Myntra Big Fashion Sale साठी एक मायक्रो वेबसाईट लाइव करण्यात आली आहे. जवळपास 23 लाख उत्पादनांसह 6 हजार ब्रांड या सेलमध्ये सहभागी होणार आहेत.

Myntra वर दरवर्षी सादर होणारा फॅशन सेल म्हणजे स्वस्तात फॅशनेबल कपड्यांची, ज्वेलरीची खरेदी होय. अनेक युवक-युवती आणि महिलावर्ग या सेलची वाट बघत असतात. मिंत्राने नुकतेच त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर या सेलबाबत महत्वाचे अपडेट दिले आहे.

Myntra ने सेलची तारीख जाहीर केली नसली तरी, या सेलमध्ये ग्राहकांना काय काय खरेदी करता येणार आहे याची कल्पना दिली आहे. Myntra Big Fashion Sale साठी एक मायक्रो वेबसाईट लाइव करण्यात आली आहे. जवळपास 23 लाख उत्पादनांसह 6 हजार ब्रांड या सेलमध्ये सहभागी होणार आहेत.

सामान्य ग्राहकांचा फायदा 

Myntra चे प्रतिस्पर्धी ई-कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्टने The Big Billion Day Sale ची घोषणा केली असून, त्यांनी देखील सेलची तारीख जाहीर केलेली नाहीये. याशिवाय अमेझॉनने देखील Grate Indian Festival Sale जाहीर केलेला आहे, अमेझॉनने देखील त्यांच्या सेलची तारीख जाहीर केलेली नाहीये. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर करतील असा अंदाज आहे. Myntra देखील याच दरम्यान सेल लाइव करू शकते. ई-कॉमर्स वेबसाईटच्या स्पर्धेत सामान्य ग्राहकांचा मात्र फायदा होणार आहे.

सणासुदीत मोठी ऑफर 

आतापर्यंतचा ग्राहकांची खरेदीची सवय बघता फेस्टिव्हल सिजनमध्ये होम डेकोर, गृहपयोगी वस्तू, किचन आणि सजावटीच्या वस्तू, बेडशीट, पडदे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. फेस्टिव्हल सिजनमध्ये या वस्तूंच्या खरेदीत 50% पेक्षा अधिक खरेदी होत असते. सध्याचा सणासुदीचा हंगाम लक्षात घेता, Myntra Big Fashion Sale मध्ये या वस्तूंवर 70% पर्यंत सवलत दिली जाण्याची शक्यता आहे.

बॉम्बे डाईंग, स्पेसेस, डी'डेकोर, एच अँड एम होम, स्टारबक्स, अँको, फिलिप्स, जेसी कलेक्शन आणि एलिमेंटरी हे लोकप्रिय ब्रांड या सेलमध्ये सहभागी होणार आहेत.

फॅशन तेही परवडणाऱ्या दरात 

जेन-झी युवावर्गाला डोळ्यासमोर ठेऊन हा सेल सादर केला जाणार आहे. Bye 1 Get 4 (एक खरेदी करा आणि चार वस्तू मिळवा) अशी धमाकेदार ऑफर या सेलमध्ये असणार आहे. याशिवाय 75% सवलत देखील ग्राहकांना दिली जाणार आहे. ग्राहकांना फ्री शिपिंगचा फायदा देखील या सेलमध्ये मिळणार आहे.