Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sovereign Gold Bond: गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक ठरली जबरदस्त फायदेशीर, पाच वर्षांत मिळाला 100% फायदा

SGB

Sovereign Gold Bond: केंद्र सरकारची सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond) गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त फायदेशीर ठरली आहे. गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजनेतून तब्बल 104.55% परतावा मिळणार आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्याने गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-18 योजनेतून मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

केंद्र सरकारची सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond) गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त फायदेशीर ठरली आहे. गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजनेतून तब्बल 104.55% परतावा मिळणार आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्याने गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-18 योजनेतून मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय (Investor allow for Pre marture redemption) आता उपलब्ध झाला आहे.

गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 या योजनेत गुंतवणूकदारांनी प्रती ग्रॅम 2964 रुपयांनी गुंतवणूक केली होती. या योजनेचा गुंतवणूक कालावधी हा 8 वर्षांसाठी होता. मात्र पाच वर्ष पूर्ण झाल्याने गुंतवणूकदारांना गोल्ड बॉंडमधून पैसे काढण्याचा पर्याय आता खुला झाला आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार गुंतवणूक काढून घेताना गुंतणूकदारांना प्रती ग्रॅमचा सोन्याचा दर विक्रमी 6063 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.यामुळे गुंतवणूकदारांची गुंतवणूक जवळपास दुप्पट झाली आहे.

गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 या योजनेतून गुंतणूक काढून घेण्यासाठी 15 एप्रिल 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्थात शनिवारपर्यंत  गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 चे गुंतवणूकदार रिडम्पशनसाठी अर्ज करु शकतात, असे आरबीआयने म्हटले आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना भक्कम निव्वळ परतावा मिळणार आहे. गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 सुरुवातीला 2964 रुपये प्रती ग्रॅम या दराने गुंतवणूक स्वीकारण्यात आली होती. आता या योजनेसाठी बाजारभावाप्रमाणे 6063 रुपये प्रती ग्रॅम इतका सोन्याचा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 104.55% इतका परतावा मिळेल.

दरम्यान, गोल्ड बॉंडवर वार्षिक 2.5% व्याज देखील मिळते. मात्र या व्याज उत्पन्नावर कर द्यावा लागतो. गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018  मधील गुंतवणुकीवरील नफा मात्र करातून वगळण्यात आला आहे. वैयक्तिक करदात्याने गोल्ड बॉंडमधून दिर्घकाळात नफा कमावला तर त्याला इंडेक्सेशनचा लाभ देऊन करातून वगळण्याची तरतूर आयकर सेक्शन 1961मध्ये आहे. 

सॉवरेन गोल्ड बॉन्डचे फायदे (Advantages of Sovereign Gold Bonds)

  • व्याज 2.5% प्रतिवर्ष, व्याज अर्धवार्षिक दिले जाते.
  • GST अंतर्गत नाही, फिजिकल  सोन्यावर 3% GST.
  • गोल्ड बॉन्डमध्ये ट्रान्सफरचे ऑप्शन आहे.
  • बाँडवर कर्ज घेऊ शकता. 
  • शुद्धतेची कोणतीही समस्या नाही.
  • मुदतपूर्तीनंतर कर नाही.
  • घरी ठेवण्याचा त्रास नाही.

सॉवरेन गोल्ड बॉन्डवरील कर नियम काय आहेत? (What are the tax rules on sovereign gold bonds?)

  • 8 वर्षांनंतर पैसे काढण्यावर कोणताही भांडवली नफा कर नाही.
  • गोल्ड बाँडवरील व्याजाची रक्कम करपात्र आहे.
  • मुदतपूर्व पैसे काढण्यावर कॅपिटल गेन टॅक्स.
  • बाँड हस्तांतरणावर दीर्घकालीन भांडवली नफ्यावर इंडेक्सेशन लाभ.
  • गोल्ड बॉन्डवर परतावा (Returns on Gold Bonds)
  • 8 वर्षात 20% व्याज मिळेल.
  • गुंतवलेल्या रकमेवर व्याज मिळते.
  • पैसे काढल्यानंतर सोन्याच्या बाजार दरावर आधारित पेमेंट.
  • व्याज व्यतिरिक्त, सोन्याच्या तेजीचा फायदा देखील आहे.