Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Update: सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला तर निफ्टी 18300 अंकावर; साखर कंपन्यांचे शेअर्स तेजीत!

Share Market Update

Share Market Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सेन्सेक्स 300 अंकांनी वर ट्रेडिंग करत आहे. तर निफ्टीत 18300 वर ट्रेडिंग करत आहे. आयटी आणि बॅंकिंग सेक्टरमध्ये तितकासा गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला नाही.

Share Market Update: शेअर मार्केटमध्ये सोमवारी (दि19 डिसेंबर) गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सकाळच्या सत्रात बीएसईचा सेन्सेक्स निर्देशांक 61,405.80 अंकावर ओपन झाला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ झाली. आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज, मारूती सुझुकी आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स तेजीमध्ये होते. तर निफ्टी 50 निर्देशांकामध्येही 100 अंकांची वाढ होऊन निफ्टी 18,300 अंकांवर ट्रेड करत आहे.

सेक्टरनिहाय शेअर मार्केटमधील परफॉर्मन्स पाहिला तर निफ्टी पीएसयू बॅंक, निफ्टी आयटी आणि निफ्टी फार्मा निर्दैशांकामध्ये तितका उत्साह दिसून येत नाही. पण निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी मिडिआ निर्देशांकामध्ये 0.8 टक्के वाढ झाली.

साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांनी वाढ!

साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांमध्ये वाढ झाल्याची दिसून आली. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, केंद्र सरकार 2022-23 या वर्षातील साखरेची निर्यात वाढवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचा अंदाज आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबर, 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात काही दिवसांपूर्वी पुन्हा वाढ करण्यात आली. ही वाढ ऑक्टोबर, 2023 पर्यंत करण्यात आली आहे. दालमिया भारत शुगर आणि इंडस्ट्रिज (440.55 रुपये), राजश्री शुगर अॅण्ड केमिकल (66.70 रुपये), शक्ती शुगर्स (34.55 रुपये), धामपुरे स्पेशिलिटी शुगर्स (34.80 रुपये) आणि यासारख्या इतर साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.