दोन दिवस बाजारात घसरण बघायला मिळाल्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण बघायला मिळत आहे. सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात झाली आहे. तसेच, निफ्टी 17,800 च्या खाली पोचला आहे. 300 अंकांच्या घसरणीसह मंगळवारी सेन्सेक्सची सुरुवात झाली, जी त्यानंतरही सुरू राहिली. शेअर मार्केट ओपन झाल्यावर एक तास पूर्ण व्हायच्या आधीच 460 अंकांपर्यंत सेन्सेक्स घसरलेला बघायला मिळाला.
जागतिक परिस्थितीमुळे बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाल्याचे विश्लेषक सांगतात. सेन्सेक्स 60400 आणि निफ्टी 17700 च्या पातळीवर सुरुवातीला ट्रेड करत होता. बाजार विक्रीत बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांचा मोठा वाटा होता. या काळात अदानी एंटरप्रायझेस निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात होता. सध्या अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांनी घसरत आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, 2396 समभागांचे व्यवहार होत आहेत. यापैकी 1492 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.
DCX system या शेअर्सकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी 15 टक्क्यांची उसळी या शेसर्समध्ये बघायला मिळाली होती. मात्र मंगळवारी यात घसरण दिसून आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बुधवारी मार्केट ओपन झाल्यावर सुरुवातीच्या वेळेत या शेअर्समध्ये किंचित वाढ बघायला मिळाली. पहिले 2 दिवस सलग घसरण झाली असली तरी मंगळवारी शेअर मार्केट वाढीसह ओपन झाले होते. आणि सेन्सेक्स-निफ्टीत दिवसाच्या सुरुवातीला वाढ झालेली दिसून आली होती. देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात थोड्या तेजीने झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी सुरुवातीच्या वेळेत वरच्या श्रेणीत व्यवहार करताना दिसत होते. सेन्सेक्सची हालचाल हळूहळू वाढत सुरुवातीच्या काही मिनिटांतच त्याने 60,800 चा टप्पा ओलांडलेला बघायला मिळाला होता. निफ्टीही 17900 च्या पुढे गेला होता. मात्र मंगळवारी शेअर बाजार बंद होईपर्यंत हे चित्र कायम न राहता यात बदल झाला. सोमवारी लाल चिन्हासह बाजार बंद झाला होता, त्याचप्रमाणे मंगळवारी दुसऱ्या दिवशीही घसरणीसह बाजार बंद झाला. या पार्श्वभूमीवर बुधवारी सुरुवात घसरणीने झाली आहे. अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्समध्ये या दिवशीही घसरण झाली होती. हिंडनबर्ग अहवालाचा अदानी ग्रुपच्या शेअर्सवर अजून परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.