Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

सलग 6 कामकाजाच्या दिवसातील घसरणीनंतर सोमवारी शेअर बाजारात काय घडते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना  सेन्सेक्स 180 अंकांनी घसरला  तर  निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता. कमकुवत जागतिक संकेतांनंतर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह उघडला. सोमवारी सेन्सेक्स 132.62 अंकांच्या घसरणीसह उघडला. सुरुवातीच्या ट्रेडमध्ये तो 300 हून अधिक अंकांनी कमी झाला होता. सुरवातीला  तो 300 अंकानी घसरल्याने 59,200 अंकांच्या खाली गेला होता. मात्र यानंतर 100-200 अंकांचे मोठे चढ -उतार पहायला मिळत होते. सध्या 255 अंकांच्या घसरणीसह 59208 अंकाच्या पातळीवर ट्रेड  करताना दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 80 अंकांच्या घसरणीसह 17,386 अंकांच्या पातळीवर ट्रेड करताना दिसून येत   आहे. सेन्सेक्समध्ये सध्या 0.39 टक्के इतकी  तर निफ्टीमध्ये 0.46 टक्केची घट दिसून आली आहे. पेटीएमचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात चार टक्क्यांनी वाढले आहेत तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली आहे.

शेअर बाजारात सलगपणे विचार केल्यास गेले 6 दिवस शेअर बाजारात घट दिसून येत  आहे. गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण झाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 59,463.93 वर आणि निफ्टी 17,465.80 वर बंद झाला आहे. आठवड्याभराचा विचार केला तर  बाजार सुमारे 3 टक्के इतका घसरल्याने सोमवारी काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. मात्र सोमवारी सकाळी बाजार उघडताना घटच झाली आहे.सोमवारीही शेअर बाजारात होत असलेल्या या घसरणीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. विश्लेषक या शेअर बाजारातील स्थितीचे विश्लेषण करताना विविध कारणे मांडताना दिसत  आहेत. जागतिक बाजारातील  कमकुवतपणा,  डॉलर इंडेक्समध्ये तेजी अशी कारणे यामागे मांडली जात आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेतील शेअर्समध्ये विक्रीचा जोर दिसून आल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 16 फेब्रुवारी रोजी बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 2.68 लाख कोटी इतके होते, मात्र हेच  24 फेब्रुवारी रोजी 2.60 लाख कोटी रुपये इतके कमी  झाले आहे. गुंतवणूकदारांना  या कालावधीत 8 लाख कोटी गमवावे  लागल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार उघडला आहे.

अदानी शेअर्सकडे देखील गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, सोमवारी सकाळीच अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरातच नव्हे तर गेला महिनाभर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे. समूहासंबंधी मोठ्या प्रमाणात नकारात्मक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र दुसरीकडे एखाद दुसरी समूहासाठी दिलासादायक बातमी देखील समोर येताना दिसत  आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या अशा सुरुवातीनंतर  एकीकडे शेअर बाजारात काय घडते त्यातही आता अदानी शेअर्स कोणत्या दिशेने जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.