सकाळी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. मात्र, मंगळवारी बाजार बंद होईपर्यंत ही स्थिती कायम राहू शकली नाही. सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 326 अंकांची तर निफ्टीमध्ये 88 अंकाची घसरण झाली आहे.देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीची प्रक्रिया सलग आठव्या दिवशीही सुरू राहिली. मंगळवारी सेन्सेक्स 326.23 अंकांनी घसरून 58962.12अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 88.75 अंकांनी घसरून 17,303.95 अंकांवर क्लोज झाला. सेन्सेक्स 0.55 टक्के आणि निफ्टी 0.51 टक्क्याने घसरला. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 14 टक्क्यांनी वधारले तर स्पाइसजेटचे शेअर्स सहा टक्क्यांनी घसरले.
मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली होती. सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली मात्र ही स्थिती शेवटपर्यंत कायम राहू शकली नाही. सेन्सेक्स सुरुवात होताना घसरण पण सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारलेला बघायला मिळाला. खरंतर मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण होत असताना आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. मात्र सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली असली तरी सेन्सेक्समध्ये अंतिमत: घसरण झालेली बघायला मिळत आहे. निफ्टीमध्येदेखील चढ उतार पाहायला मिळत होते. मात्र 88 अंकांच्या घसरणीसह अखेर बाजार क्लोज झाला आहे. मॉर्निंग ट्रेडमध्ये बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, The new India assurance compony ltd यांच्यामध्ये वाढ झाली होती, तसेच सकाळच्या सुरुवातीच्या काही मिनिटात द न्यू इंडिया 4 टक्क्यापेक्षा अधिक तर बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा 2 टक्क्याहून अधिक किमतीने वधारले होते.
सध्या जागतिक बाजारपेठेत कमजोरी असून गेल्या आठवड्यात डाऊ जोन्समध्ये सलग चौथ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळत होती. काल सकाळी आशियाई बाजारावर खूप दबाव होता आणि सर्व प्रमुख निर्देशांकात घसरण झालेली बघायला मिळत होती. अमेरिकेत पुन्हा एकदा महागाई वाढल्याने फेड रिझव्र्ह पुढील दोन-तीन बैठकांमध्ये व्याजदर वाढवू शकतो, असा कयास आता बाजारातील निरीक्षकांकडून बांधण्यात आला होता. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 31 हजार कोटी रुपयांचे समभाग विकण्यात आले असून त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येत आहे असल्याचेही विश्लेषक सांगत आहेत.