Recurring Deposit Rate Hike: सध्या बँकांनी फक्त मुदत ठेवींवरील व्याजदारत वाढ केली नाही तर Recurring Deposit (आवर्ती ठेव)च्या व्याजदरातदेखील वाढ केली आहे. काही बँका तर आरडीवर 10 टक्क्यांपर्यंत इंटरेस्ट रेट देत आहेत. आरबीआयने मे 2022 पासून रेपो दरात 2.50 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी कर्जावरील व्याजदराबरोबरच मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवीवरील व्याजदरात देखील वाढ केली आहे.
मे 2022 मध्ये रेपो दर 4.4 टक्के होता, तो वाढत-वाढत आता 6.5 टक्क्यांवर आला आहे. त्यामळे या वर्षभरात मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवींच्या व्याजदरात चांगलीच वाढ झाली आहे. काही बँकांचे मुदत आणि आवर्ती ठेव योजनांचे व्याजदर हे जवळपास समान आहेत. मे 2023 मध्ये सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने (Suryoday Small Finance Bank-SSFB) ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षांच्या मुदत आणि आवर्ती ठेवींसाठी 9.6 टक्के व्याजदर जाहीर केला आहे. हा दर जवळपास 10 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
दी युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी आणि आरडी (मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी) वरील व्याजदर 9.5 टक्के ठेवला आहे. या बँकेने सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी देखील आरडी आणि एफडीचा व्याजदर 9 टक्के ठेवला आहे.
Table of contents [Show]
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank-SSFB)
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक सध्या 5 वर्षांच्या आरडी (Recurring Deposit-RD)वर ज्येष्ठ नागरिकांना 9.6 टक्के व्याज देत आहे. तर खातेधारकांना बँक 9.1 टक्के व्याजदर देत आहे. जर एखाद्या ज्येष्ठ गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी 5000 रुपयांची मासिक आरडी केली असेल तर, त्या गुंतवणूकदाराला 5 वर्षांनंतर 3.85 लाख रुपये मिळतील.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Bank)
युनिटी स्मॉल फायनान्स बँक वरिष्ठ नागरिकांना 1001 दिवसांच्या गुंतवणुकीवर 9.5 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना जर 5 वर्षांसाठी आरडीमध्ये गुंतवणूक केली तर बँक त्यावर 8.15 टक्के व्याजदर देत आहे. इतर बँका 1001 दिवसांच्या गुंतवणुकीवर 9.1 टक्के व्याज देत आहे; तर 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर 7.65 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांसाठी, प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची आरडी युनिटी बँकेत केली तर त्यांना 5 वर्षानंतर 3.7 लाख रुपये मिळतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या 5 वर्षांच्या आरडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के व्याज देत आहे. तर इतर ग्राहकांना बँक 6.6 टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्येक महिन्याला 5 रुपये आवर्ती ठेव योजनेत गुंतवले तर त्यांना 5 वर्षांनंतर 3.6 लाख रुपये मिळतील.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
एचडीएफसी बँक सध्या आरडी स्कीमवर सिनिअर सिटिझन्सना 7.5 टक्के तर सर्वसाधारण ग्राहकांना 7 टक्के व्याज देत आहे. प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक आरडी मध्ये केल्यास ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांनी अंदाजे 3.6 लाख रुपये मिळतील. एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.5 आणि 10 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)
आयसीआयसीआय बँक सध्या ज्येष्ठ नागरिकांना रिकरिंग डिपॉझिटवर 5 वर्षांसाठी 7.5 टक्के व्याज देत आहे. तर इतर ग्राहकांना 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.9 टक्के व्याज देत आहे.