• 27 Mar, 2023 05:54

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Insurance: हॅचबॅक, SUV किंवा सेडान; गाडीच्या आकारानुसार इन्शुरन्स प्रिमियम वाढतो का?

Car Insurance

अपघात कोणत्याही वेळी आणि परिस्थितीत होऊ शकतो. अशा वेळी कार विमा तुमच्या मदतीला येतो. तसेच वाहनाचा विमा असणं हे कायदेशीरित्या अनिवार्यही आहे. तुमच्या महागड्या कारची, कुटुंबियांच्या किंवा इतर सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार विमा अत्यंत गरजेचा आहे. मग तो छोटासा अपघात असो किंवा गंभीर अपघात, योग्य विम्याचे संरक्षण फायद्याचा ठरेल. गाडीचा विमा कोणत्या गोष्टींवर ठरतो, हे आपण या लेखात पाहूया!

Car Insurance Premium: आरामशीरपणे कार चालवत असताना पुढच्या क्षणातही अनर्थ घडू शकतो. अपघात कोणत्याही वेळी आणि कसल्याही परिस्थितीत होऊ शकतो. अशा वेळी कार विमा तुमच्या मदतीला येतो. तसेच वाहनाचा विमा असणं हे कायदेशीरित्या अनिवार्यही आहे. तुमच्या महागड्या कारची आणि कुटुंबियांच्या किंवा इतर सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार विमा अत्यंत गरजेचा आहे. मग तो छोटासा अपघात असो किंवा गंभीर अपघात, योग्य विम्याचे संरक्षण फायद्याचा ठरेल. गाडीचा विमा कोणत्या गोष्टींवर ठरतो, हे आपण या लेखात पाहूया!

अनेकांसाठी कार ही खुप प्रिय अशी गोष्ट असते. ते कारकडे फक्त एक प्रवासाचं साधन म्हणून पाहत नाहीत. कारला एक कुटुंबाचा हिस्साच समजतात. त्यामुळे कार विमा काढण्याचा निर्णय हा फक्त आर्थिक नसून कधीकधी भावनिकही होतो. तुमची महागडी कार त्यामुळे सुरक्षितही होते. कार खरेदी करताना ब्रँड, किंमत, मॉडेल, रंग याबाबत जसा खूप विचार केला जातो, तसेच विमा घेतानाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. 

कारचा विमा कोणत्या गोष्टींमुळे बदलतो? (How car premium changes)

हॅचबॅक, सेडान आणि SUV हे पर्याय कार घेताना ग्राहकांपुढे असतात. गाडी कोणत्या प्रकारची आहे, याचा थेट परिणाम प्रिमियमवर होत नाही. मात्र, गाडीतील फिचर्स आणि सेगमेंटचा परिणाम विम्याच्या प्रिमियमवर होतो. काही एसयूव्ही शक्तीशाली इंजिनसह येतात, त्यांच्यामध्ये 4×4 driving systems असते. खडकाळ, डोंगराळ रस्त्यांवरून चालवता येण्याची क्षमता वाहनामध्ये असते. अशा परिस्थितीत गाडीचा विमा हॅचबॅक सेगमेंटमधील कारपेक्षा जास्त असू शकतो.

जेव्हा आपण सेडान गाडीचा विचार करतो, तेव्हा स्टाइल, लेगरुम आणि मोकळ्या स्पेसचा प्रामुख्याने विचार होतो. जर कार आलीशान श्रेणीतील असेल तर किंमतही सहाजिक जास्त असते. अशा कारसाठीही प्रिमियम जास्त भरावा लागतो का? हॅचबॅक गाड्यांशी तुलना करता सेडान गाड्यांचे इंजिन जास्त क्षमतेचे असते. त्यामुळे विम्याचा प्रिमियमही वाढतो.

मागील काही वर्षांपासून कॉम्पॅक्ट SUV चे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सेडान गाड्यांना जेवढा प्रिमियम लागतो, तेवढाच SUV गाड्यांनादेखील लागतो. SUV गाड्यांमध्ये मोकळी जागा, इंटिरिअर, ग्राऊंट क्लिअरन्स, उच्च क्वालिटीची फिचर्स आणि गाडी चालवण्याचा चांगला अनुभव येण्यासाठीची सर्व फिचर्स देण्यात येतात. तसेच SUV आणि सेडान श्रेणीतील गाड्यांमधील किंमतीची तफावत देखील कमी होत आहे. या दोन्ही गाड्यांतील विम्याचा प्रिमियमही एकसारखाच झाला आहे. पारंपारिक SUV गाड्यांच्या विम्याचा प्रिमियम सेडान गाड्यांपेक्षा कमी मात्र, हॅचबॅक गाड्यांपेक्षा जास्त आहे.

कोणत्या गोष्टींवर प्रिमियमची रक्कम ठरते? (Factors that decide car Insurance)

थर्ड पार्टी विमा काढताना इंजिनची क्षमता किती आहे, यावर तुम्हाला किती प्रिमियम (Car Insurance premium) भरावा लागेल, हे ठरते. थर्ड पार्टी SUV आणि आलिशान सेडान गाड्या ज्यांचे इंजिन 1,499 cc पेक्षा जास्त आहे, त्यांना 7,897 + कर एवढा प्रिमियम भरावा लागतो. हॅचबॅक गाड्यांचे इंजिन 1,000 cc पेक्षा कमी असते. त्यामुळे या गाड्यांचा प्रिमियम 2,094 + कर एवढा असू शकतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स वाहन कायद्याद्वारे बंधनकारक आहे.

लहान क्षमतेचे इंजिन असलेल्या सेडान गाड्यांचा विमा तुलनेने जास्त CC चे इंजिन असलेल्या सेडान गाड्यांपेक्षा कमी असतो. मात्र, सेडान गाडीचा ब्रँड आणि मॉडेल प्रिमियम ठरवताना विचारात घेतल जाते. गाडीला अधिक आकर्षक करण्यासाठी अनेक वेळा वाहन चालकांकडून कारमध्ये बदल (मॉडिफिकेशन) केले जातात. त्याचाही परिणाम विम्याच्या रकमेवर होतो.

इंजिनचा प्रकार कोणता आहे यावरही विम्याची रक्कम ठरते. पेट्रोल कारपेक्षा डिझेल कारसाठी जास्त प्रिमियम आकारला जातो. गाडीचे वय, insured declared value (IDV), अॅड-ऑन्स अशा गोष्टींवरही प्रिमियम अवलंबून असतो. आलिशान श्रेणीतील कार खरेदी करत असाल तर IDV आणि प्रिमियम जास्त आकारला जाऊ शकतो. शेवटी तुम्ही गाडी कोणतीही खरेदी करा, पुरेस विमा संरक्षण गरजेचे आहे. काळजीपूर्वक वाहन चालकांनाही किती विम्याचे संरक्षण घ्यावे, याबाबत गोंधळ होतो. नाहीतर ऐनवेळी खिशातून पैसे घालायची वेळ येईल.