Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Insurance add-on: पावसाळा सुरू होण्याआधी कार इन्शुरन्समध्ये हे चार Add-ons ठरतील फायद्याचे

car insurance

पावसाळा तोंडावर आला आहे. मुसळधार पावसामुळे तुमच्या कारचे नुकसान होऊ शकते. वादळी पावसामुळे गाडीवर झाड पडून, कार पाण्यात बुडाल्याने इंजिन आणि वायरिंग, डॅशबोर्ड, इलेक्ट्रिक पार्ट खराब होऊ शकतात. तसेच गाडी रस्त्यातच ब्रेकडाऊन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे विमा पॉलिसीसोबत काही महत्त्वाचे Add-on घेतले तर तुम्ही अडचणीत येणार नाहीत.

Car Insurance add-on: पावसाळा तोंडावर आला आहे. मुसळधार पावसामुळे तुमच्या कारचे नुकसान होऊ शकते. जसे की, वादळी पावसामुळे झाड पडून कारचे नुकसान होऊ शकते, तसेच कार पाण्यात बुडाल्याने इंजिन आणि इलेक्ट्रिक वायरिंग खराब होऊ शकते. तसेच बऱ्याच वेळा जोरदार पावसामुळे गाडीतील इलेक्ट्रिक पार्टही खराब होतात. (Monsoon car damage Insurance cover) तुमच्याकडे कॉप्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स असेल तरीही पावसाळ्यात होणाऱ्या नुकसानीपासून पूर्णत: संरक्षण मिळत नाही.

जर गाडी पाण्यामध्ये बुडाल्याने इंजिन खराब झाले तर विमा कंपनी तुम्हाला फक्त रेग्युलर कार विम्याद्वारे संरक्षण देणार नाही. किंवा नुकसानीची पुर्ण रक्कम अदा करणार नाही. काही पैसे तुम्हाला खिशातून घालावे लागतील. मात्र, जर तुम्ही मूळ विमा पॉलिसीसोबत काही अॅड ऑन म्हणजेच अतिरिक्त सुरक्षा कवच घेतले तर तुमची चिंता दूर होऊ शकते.

गाडीचे इंजिन दुरूस्त करण्याचा खर्च खूप जास्त असू शकतो. त्यापेक्षा अॅड-ऑन द्वारे तुम्हाला कमी पैशात संरक्षण मिळू शकते. झाड, वीजेचे पोल किंवा इतर वस्तू गाडीवर पडून नुकसान झाल्यास पूर्ण संरक्षण मिळत नाही. त्यासाठी तुम्ही खास अतिरिक्त संरक्षण घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात दृश्यमानता कमी झालेली असते. रस्त्यावरुन वाहन घसरण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जर कॉम्प्रिहेन्सिव्ह कार इन्शुरन्स घेतला असेल आणि त्यासोबत अॅड-ऑन घेतले तर तुमच्या गाडीला अतिरिक्त सुरक्षा मिळते. तुम्हाला कार दुरुस्तीसाठी खिशातून पैसे खर्च करण्याची गरज नाही.

इंजिन सुरक्षा अॅड-ऑन (Engine Secure Add-on)

जेव्हा कार पाण्यामध्ये बुडालेली असताना सुरू करण्याचा प्रयत्न केला तर इंजिनला नुकसान पोहचू शकते. (Car damage due to rain) रेग्युलर कार इन्शुरन्सद्वारे अशा प्रकारे नादुरुस्त झालेले इंजिन नीट करण्यासाठी विमा संरक्षण मिळत नाही. यास consequential damage असे म्हणतात. इंजिन प्रोटेक्शन अॅड-ऑन कव्हर तुम्हाला यापासून संरक्षण देईल. खूप जुन्या कारसाठी हा अॅड-ऑन फायद्याचा ठरणार नाही. मात्र, जर तुमची कार नवी असेल आणि तुम्ही पूरग्रस्त किंवा जास्त पाऊस पडणाऱ्या भौगोलिक क्षेत्रात राहत असाल तर हा कव्हर तुमच्या फायद्याचा ठरेल.

रोडसाइड असिस्टंट कव्हर (Roadside Assistance Cover In Car Insurance)

पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या बाजूला नादुरुस्त झालेल्या अनेक कार दिसतात. मुसळधार पावसात मदतीची शक्यताही कमी असते. अशा परिस्थितीत रोडसाइड असिस्टंट अॅड-ऑन कव्हर कामाला येईल. जर तुमची गाडी निर्जनस्थळी बंद पडली किंवा पाणी साठल्यामुळे अडकून पडली तर तुम्हाला विमा कंपनीकडून मदत पाठवली जाते.

यामध्ये कार टोइंग करून नेण्याची सुविधा देण्यात येते किंवा कार चालू होत नसल्यास मॅकॅनिकलाही बोलवू शकता. यासाठी तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही. विमा कंपनी या सर्व गोष्टींची काळजी घेईल. बॅटरी खराब झाल्यास, टायर पंक्चर झाल्यास किंवा इंधन संपल्यासही मदत मिळवता येते. तुम्ही जर नव्यानेच कार खरेदी केली असेल आणि कारबाबत जास्त माहिती नसल्यास हा अॅड ऑन कामाला येऊ शकतो.

झिरो डेप्रिशिएशन कव्हर (Zero Depreciation -Depreciation Reimbursement)

झिरो डेप्रिशिएशन कव्हर मध्ये गाडीचा एखादा पार्ट खराब झाल्यास विमा कंपनीकडून त्याचे पूर्ण पैसे मिळतात. गाडीचे स्पेअरपार्ट आणि कंपोनंट जसे गाडी जुनी होते तसे खराब व्हायला सुरू होते. त्यास घसारा म्हणतात. जेव्हा हे स्पेअरपार्ट बदलण्याची वेळ येते तेव्हा कंपनी घसारा वगळून रक्कम अदा करते. मात्र, झिरो डेप्रिशिएशन कव्हर घेतल्यास तुम्हाला त्या पार्टची संपूर्ण रक्कम परत मिळते.

कन्झ्युमेबल अॅड-ऑन (Cover for Consumable add-on)   

गाडी दुरूस्ती करताना कन्झ्युमेबल गोष्टींची गरज पडते. जसे की, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, कूलंट. पावसामुळे जर इंजिन पाण्यामुळे खराब झाल्यास हा खर्च जास्त असू शकतो. जर तुमच्याकडे कन्झ्युमेबल अॅड ऑन नसेल तर हा खर्च तुम्हाला स्वत:च्या खिशातून करावा लागेल. (Car damage due to rain insurance cover) इतरही अनेक अॅड ऑन सुरक्षा कवच असतात. मात्र, वरील चार अॅड ऑन पावसाळ्यातील तुमचा त्रास कमी करतील. 

मान्सून सिझनमध्ये वरील अॅड-ऑन कोणी खरेदी करावेत?

तुमच्या मूळ विम्यासोबत अॅडऑन खरेदी करताना तुम्हाला जास्त पैसे माजावे लागतील. हे अॅड ऑन प्रत्येकासाठी फायद्याचे ठरतीलच असे नाही. तुमची गरज पाहून तुम्ही अतिरिक्त सुरक्षा कवच खरेदी करू शकता. पण, प्रामुख्याने तुम्ही जर जास्त पाऊस पडणाऱ्या भागात किंवा पुराचा धोका जास्त असलेल्या भागात राहत असाल हे अतिरिक्त कव्हर जास्त फायद्याचे ठरतील. 

मुंबई, गोवा, बंगळुरू अशा मोठ्या शहरांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे तुम्ही जर अशा शहरांमध्ये राहत असाल तरी हे कव्हर फायद्याचे ठरू शकतात. किनारी भागात राहणाऱ्या वाहनमालकांनी सुद्धा या अॅडऑन्सचा विचार करावा.