SEBI is taking action against stock market advisors: भांडवली बाजार नियामक मंडळ, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने गुरुवारी शेअर्समध्ये मोठ्या ऑर्डर देण्यापूर्वी व्यापार करून नफा कमावण्याशी संबंधित प्रकरणात शोध आणि जप्तीची कारवाई केली. ही बाब टेलिव्हिजनवर दिसणार्या बाजार तज्ज्ञांशी संबंधित आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीने सहा संस्था, त्यांचे मालक आणि त्यामध्ये काम करणारे बाजार तज्ज्ञ यांच्या अधिकृत कार्यालय आणि निवासी जागेची झडती घेतली गेली. शेअर्सच्या मोठ्या ऑर्डर येण्यापू्र्वीच ट्रेडिंग करून, संस्था स्वत: मोठा लाभ कमावतात, असा संशय या संस्थांच्या बाबत होता. हा व्यवसाय प्रकार पूर्णत: बेकायदेशीर मानला जातो. या संस्थांची यापूर्वीही चौकशी केली गेलेली होती, त्यावेळी कोणते पुरावे किंवा गुन्ह्याचे धागेदोरे सापडले नाहीत. मात्र या संस्थांविरोधात सातत्याने तक्रारी येत होत्या, तसेच कंपन्यांना प्रत्येक वेळी होणार लाभ, टिव्हीच्या माध्यमातून दिलेले प्रेडिक्टशन यावरुन या संस्थांबाबत संशय होता. यामुळे अखेरीस सेबीने झडती घेण्याचे पाऊल उचलले.
जयपूर, कोलकाता, नोएडा आणि पुणे येथे अनेक ठिकाणी ही शोध आणि जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने प्रकाशित केले आहे. तपास प्रक्रिया अजूनही सुरू आहे, तसेच सेबी या सहा संस्थांवर पाळत ठेवणार आहे. अंतर्गत दक्षता यंत्रणा शोध घेत आहे की, यात कोणता आर्थिक घोटाळा दडला आहे. पंप आणि डंप घोटाळ्याचा पुढचा प्रकार म्हणजे फ्रंट रनिंग, या घोटाळ्यात फ्रंट रनिंग या बेकायदेशीर पद्धतीद्वारे पैसा कमावला जात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
टिव्ही चॅनेलवर बाजार तज्ज्ञांनी शिफारस केलेले स्टॉक प्रथम त्यांच्याशी संलग्न संस्थांनी खरेदी केले होते. जेव्हा मोठ्या संख्येने गुंतवणूकदार त्यांच्या शिफारसींच्या आधारे ते शेअर्स घेतील, तेव्हा संबंधित संस्था ते शेअर्स विकतील.
फ्रंट रनिंग हे सेबीच्या प्रतिभूती बाजाराशी संबंधित फसवणूक आणि अनुचित व्यापार क्रियाकलाप प्रतिबंध नियम, 2003 अंतर्गत बेकायदेशीर आहे. सेबीच्या अधिकाऱ्यांनी शोध आणि जप्तीच्या कारवाईदरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट आणि हार्ड ड्राइव्ह डिस्कसह रेकॉर्ड जप्त केले. जप्त केलेल्या उपकरणांमधून डेटा, ईमेल आणि इतर कागदपत्रे मिळविली जात आहेत.