Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI Recovery Pending: सेबीची 68 हजार कोटींची वसुली थकली, गुंतवणूकदारांच्या नशिबी प्रतीक्षाच

Sebi , SEBI

Image Source : Twitter.com

SEBI Recovery Pending : भांडवली बाजाराची नियंत्रक सेबीला सध्या नव्या चिंतेने ग्रासले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करुन हजारो कोटींची लूट करणाऱ्या कंपन्यांची वसुली प्रक्रिया ठप्प झाली आहे.

भांडवली बाजाराची नियंत्रक सेबीला सध्या नव्या चिंतेने ग्रासले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करुन हजारो कोटींची लूट करणाऱ्या कंपन्यांची वसुली प्रक्रिया ठप्प झाली आहे. अशा प्रकरणांमधील तब्बल 68 हजार कोटी वसूल करणे अशक्य असल्याचे सेबीने आपल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या परताव्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. 

सर्वसामान्य माणसाचा कर्जाचा हप्ता पुढे मागे झाला तर वसूल करण्यात तत्परता दाखवली जाते. मात्र एखाद्या बड्या व्यावसायिकाचे शेकडा, हजारो कोटी बुडवले जाताना आपण बघतो. तसेच,  एखाद्या कायदेशीर यंत्रणेने सर्वसामान्यास एखादा दंड सुनावला तर ती व्यक्ती तो दंड भरण्यास तत्परता दाखवते. पण, संस्था आणि कंपन्या मात्र याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसते. सेबीची वसुली विविध कारणांमुळे रखडल्याने गुंतवणूकदारांची परतावा देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. सहारा, PACL या कंपन्यांकडून सेबीला वसुली करायची आहे.

थकबाकी कोणत्या कारणासाठी ?

सेबीच्या 2021-22 च्या वार्षिक अहवालानुसार खोटी आश्वासने, आमिषे दाखवून वित्तीय संस्थानी केलेली गुंतवणूकदारांची फसवणुकीबाबत जवळपास 96 हजार 609 कोटींची वसुली थकीत आहे. यामध्ये वेगळ्या प्रकारच्या थकबाकीचा समावेश आहे. दंड, शुल्क न भरणे, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या निर्देशांचे पालन करण्यास कुचराई यांसारख्या प्रकारच्या  थकबाकी आहेत.

‘वसुलीस अशक्य’ श्रेणीत मोठी रक्कम Difficult To Recover (DTR)

यातील 63 हजार 206 कोटी वसुलीस अशक्य या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत.67 हजार 228 कोटींची थकबाकी ‘डीटीआर’मध्ये वर्गीकृत करण्यात आली आहे. ‘डीटीआर’मध्ये वर्गीकृत केलेली असणे म्हणजे ‘थकबाकी अशक्य’ ("difficult to recover) असा याचा अर्थ आहे.  वसुलीच्या सर्व पद्धतींचा अवलंब करूनही वसूल होऊ न शकलेली रक्कम असा याचा अर्थ आहे. 68 हजार 109 कोटी रुपयासंबंधित प्रकरणे विविध न्यायालये आणि न्यायालय नियुक्त समित्यांसमोर प्रलंबित आहेत. त्यामुळे या प्रकरणांमध्ये सेबीच्या वसुलीची कार्यवाही न्यायालय किंवा संबधित समितीच्या निर्देशांचांवर अवलंबून आहे.

वसुलीला खीळ बसल्याने सेबीने नुकताच वसुलीस अशक्य या श्रेणीत 67,228 कोटी रुपयांचा समावेश केला.भांडवल बाजाराचे नियंत्रण व विकास घडवून आणण्यासाठी सेबीची स्थापना झाली. भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सेबीची भूमिका महत्वाची असते. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली न झाल्याने गुंतवणूकदारांच्या मनात धडकी भरली आहे.