सध्या विविध बँकांच्या विविध योजना आहेत. नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसेल अशावेळी दरमहा काहीतरी रक्कम आपल्या खात्यात जमा व्हावी, यासाठी एसबीआयची (State Bank of India) एक योजना आहे. एसबीआय सरल पेन्शन योजना. एसबीआय ही देशातली सार्वजनिक क्षेत्रातली मोठी बँक आहे. ग्राहकांसाठी बँकेमार्फत विविध योजना उपलब्ध आहेत. त्यातच आणखी एक योजना आणली आहे. याद्वारे निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला जसा पगार मिळतो, तसे पैसे तुम्हाला मिळणार आहेत.
आयुष्यभर पेन्शनचा लाभ
लाइफटाइम पेन्शनचे फायदे देणारी अशी ही स्कीम आहे. सेवानिवृत्तीनंतर तुम्ही स्वत:च्या पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करता येवू शकणार आहेत. तुमच्याकडे जी जीवन विमा असेल, त्यालादेखील तुम्ही ही योजना जोडू शकता. शिवाय या स्कीमचा फायदा असा की यात बोनसदेखील मिळतो.
सरल योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे
विविध सरकारी तसंच खासगी बँका, पोस्ट ऑफिसतर्फे बचतीच्या योजना राबवल्या जातात. प्रत्येक योजनेचे विविध फायदे आहेत. 6 टक्क्यांपासून जास्तीत जास्त 8 टक्क्यांपर्यंत परतावादेखील मिळतो. दीर्घकालीन गुंतवणुकीत मॅच्युरिटीनंतर नियमित उत्पन्न मिळावं, ही अपेक्षा असते. ती या योजनेत पूर्ण होते.
- सरल पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास निवृत्तीपर्यंत तुमच्याकडे एक चांगला आर्थिक पर्याय तयार होतो.
- तुमच्या जीवन विमा योजनेला ही योजना जोडता येवू शकते.
- सरलमध्ये 50 लाख रुपये जीवन विमा कव्हरही जोडता येवू शकतं. यात 5 वर्षांसाठी बोनस तुम्हाला मिळतो.
- कधी रक्कम काढायची असेल तर ती सोयही यात आहे. जमा रकमेपैकी एक तृतीयांश पैसे काढण्याची मुभा आहे.
- योजनेमध्ये पैसे गुंतवल्यास त्यावर कर नाही. 1.50 लाखांपर्यंत रकमेवर करलाभ मिळतो.
- या योजनेच्या माध्यमातून 6 टक्क्यांपर्यंत पीपीएफ रिटर्न मिळतो.
- या योजनेत म्युच्युअल फंड तसंच एफडीद्वारेही पैसे जमा करता येवू शकतात.