Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI MF Scheme: 1 लाखाचे झाले 27 लाख; स्टेट बँकेच्या 'या' म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांना केले मालामाल

SBI Focused Equity Fund

Image Source : www.sbimf.com

म्युच्युअल फंडमधील दीर्घकाळ गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे स्टेट बँकेचा म्युच्युअल फंड होय. या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना 27 लाख रुपये परतावा मिळाला. स्टेट बँक म्युच्युअल फंडची ही योजना कोणती? वाचा.

SBI Focused Equity Fund: भांडवली बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते. अनेक वेळा लाखाचे बारा हजार होण्याचीही शक्यता असते. मात्र, दीर्घकाळ एखाद्या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होण्याची शक्यता वाढते. याचे उदाहरण म्हणजे एसबीआय फोक्सड इक्विटी फंड. या फंडाने गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. योजना सुरू झाल्यापासून गुंतवणूकदारांना वार्षिक 18. 91% दराने परतावा मिळाला आहे. 

1 लाखाचे झाले 27 लाख रुपये

एसबीआय फोक्सड म्युच्युअल फंड योजना 2004 साली सुरू झाली आहे. या योजनेत ज्या गुंतवणूकदारांनी एकरकमी 1 लाख रुपये गुंतवले होते. त्यांना 27 लाख रुपये परतावा मिळाला आहे. हा फंड गुंतवणुकदारांसाठी मल्टिबॅगर ठरला आहे. ही एक ओपन एंडेड स्कीम असून दिर्घकाळासाठी हाय क्वालिटी स्टॉक्समध्ये पैसे गुंतवण्यात येतात. सखोल रिसर्च आणि अभ्यासाअंती गुंतवणूक केली जाते. त्याचाच परिणाम म्हणून फंडाने दिर्घकाळात गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले. 

10 वर्षांच्या एसआयपीतून 15 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स 

जोखीम घेण्याची क्षमता आणि दीर्घकाळ बाजारात तग धरलेल्या गुंतवणूकदारांचा फायदा झाला. 10 वर्षांपेक्षा जास्त एसआयपी या फंडमध्ये असती तर 15.66% पर्यंत रिटर्न्स मिळाले असते. म्हणजेच 2013 साली प्रति महिना 10 हजार गुंतवले असते तर एकूण गुंतवणूक 12 लाख रुपये आणि एसआयपीचे परताव्यासहीत मूल्य 26.93 लाख रुपये झाले असते.   

जर 15 वर्षांसाठी एसआयपी असती तर 17.42% परतावा मिळाला असता. 18 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 75 लाख रुपये झाले असते.  

कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक

हा फंड 2009 पासून आर. श्रीनिवासन यांच्याद्वारे व्यवस्थापित केला जात आहे. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत या फंडमधील अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 29,480 कोटी एवढी आहे. (SBI Focused Equity Fund returns) 22 देशी आणि विदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये फंड हाऊसकडून गुंतवणूक करण्यात आली आहे. फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, टेलिकम्युनिकेशन, आयटी, हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक आहे. 

एचडीएफसी बँक, अल्फाबेट, आयसीआयसीआय बँक, मुथ्थुट फायनान्ससह इतर कंपन्यांमध्ये फंडाची गुंतवणूक आहे. HDFC मध्ये सुमारे 8% आणि अल्फाबेट कंपनीत 7% गुंतवणूक आहे.