Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI UPI QR Cash: एसबीआय बँकेचे खातेदार आता विना ATM पैसे काढू शकणार…

SBI UPI QR Cash

SBI ने आपल्या YONO ॲप अपग्रेड केले असून त्यात हे नवे फिचर उपलब्ध करून दिले आहे. केवळ UPI QR कॅश फंक्शन असलेल्या ATM मधूनच विना एटीएम कार्ड पैसे काढता येणार आहे. येत्या काळात जास्तीत जास्त एटीएम अपग्रेड केले जाणार आहेत.

आता स्टेट बँक इंडियाच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. बँकेने त्यांच्या ग्राहकांना एक अनोखी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. SBI बँकेचे खातेदार आता  UPI QR कॅश फंक्शन असलेल्या कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांना कायम ATM कार्ड आपल्या सोबत बाळगण्याची गरज नाहीये. SBI ने कार्डलेस कॅश काढणे इंटरऑपरेबल केल्यामुळे बँकेचे लाखो ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

SBI ने आपल्या YONO ॲप अपग्रेड केले असून त्यात हे नवे फिचर उपलब्ध करून दिले आहे. केवळ UPI QR कॅश फंक्शन असलेल्या ATM मधूनच विना एटीएम कार्ड पैसे काढता येणार आहे. येत्या काळात जास्तीत जास्त एटीएम अपग्रेड केले जाणार आहेत. 

कसे काढता येणार पैसे?

'UPI QR Cash' हे फिचर वापरून, वापरकर्ते ATM स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करू शकणार आहेत. ग्राहक त्यांच्या UPI ऍप्लिकेशनच्या 'स्कॅन-अँड-पे' या सुविधेचा, फिचरचा वापर कसून पैसे काढू शकतील. यासाठी ग्राहकांचे KYC क्लियर असणे देखील आवश्यक आहे. या सुविधे द्वारे ग्राहकांना ATM [पिन टाकण्याची देखील आवश्यकता नसेल. थेट ग्राहकांच्या मोबाईल ॲपद्वारे QR कोड स्कॅन होणार असल्यामुळे यात ग्राहकांची फसवणूक होणार नाहीये असे बँकेचे म्हणणे आहे.

SBI चे चेअरमन दिनेश खारा यांनी शनिवारी देशभरातील टॉप-21 जिल्हा केंद्रांवर 34 ट्रान्झॅक्शन बँकिंग हब लाँच केले आहेत. बँकिंग हबच्या निमित्ताने ग्राहक एकाच छताखाली त्यांचे आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. नागरिकांना डिजिटल बँकिंगची सुविधा देण्याचा हा एसबीआयचा प्रयत्न आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार व्यवहार करता येणार आहेत, त्यामुळे त्यांची बँकेवरील निर्भरता कमी होईल आणि त्यांच्या मोबाईलवर त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होतील असे बँकेने म्हटले आहे. बँकेने 2017 साली YONO हे ॲप लॉन्च केले आहे, आजवर देशभरात 60 दशलक्ष ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत.