स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकेत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचीच खाती आहेत. आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि त्यांचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी नवा नियम लागू केला आहे. SBI ने एटीएममधून पैसे काढण्यासाठीनवीन नियम काढला आहे. यापुढे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी OTP (one time password ) अनिवार्य असणार आहे. रोख रक्कमेचा व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
सायबर गुन्हांना आला घालण्यासाठी नवीन नियम
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून OTP शिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाही. ग्राहकाला 10 हजारांहून अधिक रक्कम एटीएममधून काढायची असल्यास त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. त्यानंतर ओटीपी आणि पीन क्रमांक नमूद करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला एटीएममधून पैसे काढता येणार आहे. SBI बँकेने या नव्या नियमांबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. ओटीपीचा वापर करून सायबर गुन्हेगारीविरोधात पाऊल असल्याचे बँकेने म्हटले. ग्राहकांना सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण देणे ही आमची प्राथमिकता असल्याचे एसबीआयने म्हटले.
ATM मधून पैसे काढण्याची नवी पद्धत
पैसे काढण्यासाठी आता SBI च्या एटीएममध्ये गेल्यावर सुरुवातीला ATM कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर पूर्वी पिन टाकून पैसे काढता येत होते. पण आता कार्ड टाकल्यानंतर OTP हा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP आल्यानंतर OTP आणि पिन टाकल्यानंतर पैसे काढता येणार आहे.
image source - https://bit.ly/39EMXkV