Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI ची अमृत कलश मुदतठेव योजना नेमकी काय आहे? तिच्यात गुंतवणूक करावी का?

SBI Amrit Kalash Scheme

SBI Amrit Kalash Deposit Scheme : स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या अमृत कलश मुदतठेव योजनेत (SBI Amrit Kalash Deposit Scheme) 7.6% परतावा देऊ केला आहे. पण, या योजनेत गुंतवणुकीसाठी काही निकष आहेत. शिवाय तुम्हाला द्यावी लागतील काही विशिष्ट कागदपत्रं. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया…

SBI Amrit Kalash Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी खास 'एसबीआय अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Scheme)' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 7.60% पर्यंत परतावा मिळत आहे. या योजनेसाठी कोण पात्र असेल, अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रं गरजेची आहेत जाणून घ्या.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या करोडो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. बँकेने मर्यादित कालावधीसाठी 'एसबीआय अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Scheme)' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 % व्याज दिले जात असून ज्येष्ठ नागरिकांना 7.60 % व्याजदर देण्यात येत आहे. त्याचबरोबर स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या योजनेवर 1% अतिरिक्त व्याजदर मिळणार आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसात अनेक बँकांनी त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ (FD Rate Hike) केल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक स्मॉल फायनान्स बँका त्यांच्या ग्राहकांना FD योजनांवर 9% पर्यंत व्याज देऊ करत आहेत. अशा स्थितीत स्टेट बँकेनेही व्याजदरात वाढ करून 'एसबीआय अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Scheme)' सुरू केली आहे. 

योजनेचे उद्दिष्ट काय?

स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे 'एसबीआय अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Scheme)' सुरु करण्याचा मुख्य उद्देश ग्राहकांना कमी कालावधीत चांगला व्याजदर प्रदान करणे हा आहे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करून चांगले व्याज मिळू शकेल. तसेच या योजनेच्या माध्यमातून लोकांना बचतीसाठी प्रोत्साहित करता येईल. सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी आणि पेन्शनधारक एसबीआय अमृत कलश योजनेचा (SBI Amrit Kalash Scheme) लाभ मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

पात्रता निकष काय?

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे 
  • सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी आणि पेन्शनधारक या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास पात्र असतील 
  • 19 वर्षांवरील नागरिक एसबीआय अमृत कलश योजनेअंतर्गत बँक खाते उघडण्यास पात्र असतील

आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड 
  • वयाचा दाखला 
  • उत्पन्नाचा दाखला 
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी

योजनेसाठी अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या SBI बँकेत जावे लागेल
  • तेथे जाऊन तुम्हाला SBI अमृत कलश योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्ज प्राप्त करावा लागेल
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील
  • यानंतर तुम्हाला अर्ज परत बँकेत जमा करावा लागेल
  • तुम्हाला खाते उघडण्यासाठी काही पैसे जमा करावे लागतील 
  • अशा प्रकारे तुम्ही SBI अमृत कलश योजनेअंतर्गत अर्ज करू शकता

योजनेचा कालावधी किती?

SBI च्या अमृत कलश योजनेचा एकूण कार्यकाळ 400 दिवसांचा आहे. या योजनेत, कोणतीही व्यक्ती 15 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत पैसे जमा करू शकते. या योजनेत सर्वसामान्यांना 7.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याज मिळत आहे. त्याचबरोबर बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1% अधिक व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन SBI अमृत कलश खाते उघडू शकता. याशिवाय, तुम्ही SBI Yono च्या माध्यमातून या योजनेत गुंतवणूक करू शकता.

तुम्हाला ही गुंतवणूक करायची असेल, तर खालील तक्ता नीट समजून घ्या

SBI FD Rates

कोणी करावी गुंतवणूक?

ज्या लोकांना त्यांचे पैसे 1 ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवायचे आहेत, अशा लोकांसाठी एसबीआय अमृत कलश योजना (SBI Amrit Kalash Scheme) खूप फायदेशीर आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही यामध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळत आहे. या एफडी योजनेत तुम्ही 1 लाख रुपये गुंतवल्यास ज्येष्ठ नागरिकांना 8,600 रुपये आणि सामान्य ग्राहकांना 8,017 रुपये व्याज म्हणून मिळतील.

SBI ने FD-RD योजनेवरील व्याजदरात केली वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या FD आणि RD योजनेचे व्याजदर वाढवत आहे. सामान्य नागरिकांना बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.00 ते 6.50% पर्यंत व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.25% पर्यंत व्याजदर देत आहे. त्याच वेळी, आरडी योजनेमध्ये, 12 महिने ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 6.80 ते 6.5 % व्याजदर दिला जात आहे.