आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुली आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून जाऊ नयेत त्याचा ही सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांच्या साहाय्यासाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना योजना लागू करण्यात आली आहे. ही अशी एक योजना आहे जिला शासनातर्फे अनुदान मिळत नाही तर समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत ते निधी गोळा करतात आणि तो पैसा राष्ट्रीयकृत बँकेत ठेव म्हणून ठेवला जातो. त्या मुदत ठेवीतून आलेल्या व्याजातून इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थीनीस शिक्षणासाठी दरमहा 30 रुपयांची मदत दिली जाते. त्याकरिता सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत जिल्हास्तरावर विश्वस्त संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत तसेच विविध ठिकाणी समाजप्रबोधन करून लोकांना मदत करण्यास प्रोत्साहीत केले जाते.
Table of contents [Show]
अंमलबजावणी (Implementation)
- शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते
- शाळा व्यवस्थापन समितीत नाव नोंदणी
पात्रता/निकष (Eligibility/Criteria)
- योजने अंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावरून निकषाच्या आधारावर 30 मुलींची या योजनेसाठी दरवर्षी निवड केली जाते.
- आईवडिलांचे छत्र हरविलेल्या अनाथ मुली आणि अस्थिव्यंग (अश्या मुली की,ज्यांची हाडे, सांधे व स्नायू हे योग्यप्रकारे कार्य करत नाहीत) त्याच्यासाठी.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुली.
- शाळेतील उपस्थिती 75% आवश्यक
- सावित्रीबाई फुले दत्तक मुलीस तिचे इ. 8 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत फक्त
उददेश (purpose)
- आर्थिकदृष्ट्या कमजोर मुलींना मदत मिळावी.
- इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या या मुलींना शिक्षणात अडसर येऊ नये.
- किमान त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलीच्या शिक्षणास चालना मिळावी.
- मुली आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडून जाऊ नयेत.
रक्कम किती मिळते? (How much is the amount)
- दरमहा 30 रुपया प्रमाणे एकूण 10 महिन्याला 300 रुपये मिळतात.
- तालुकास्तरावर पात्र ठरलेल्या या लाभार्थी कन्यारत्नांना धनादेशाद्वारे मदत उपलब्ध करून दिली जाते.
- अनुदानही वाटप समाजातील शिक्षणप्रेमी, दानशूर, व्यक्तीकडून मिळणारा स्वयंस्फूर्त प्रतिसादातून केले जाते.
- लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयन्त केले जातात.