Digital Satbara: शेत जमीन असो, प्लॉट असो की कोणताही जमिनीचा तुकडा असो, त्याचा मालकी हक्क (Proprietary Rights) कोणाकडे तरी असतोच. जी जमीन एखाद्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर त्यावर सरकारचा मालकी हक्क असतो. शेती असो वा घर या दोन्हीच्या जागेसाठी अनेकदा आपण वाद होतांना बघतो. त्या वादाची पूर्तता करण्यासाठी उपयोगात येणारा दस्तऐवज म्हणजे 7/12 उतारा. जमिनीचा मुख्य पुरावा हा जमिनीचा 7/12 उतारा असतो. (The main proof of land is 7/12 of the land.)जमीन कोणाची आहे हे सिद्ध करण्यासाठी 7/12 हा महत्वाचा आहे. अनेक वेळा जमीन खरेदी विक्री करतांना बोगस 7/12 वापरण्यात येतो, 7/12 बोगस आहे का? हे तपासण्यासाठी काय करावे जाणून घेऊया.
तलाठ्यांची सही चेक करणे (Checking the signature of the talathi)
गेल्या काही वर्षांपासून आता 7/12 वर डिजिटल (7/12 Online Utara)सही केली जात आहे. जमिनीची खरेदी विक्री करताना 7/12 उताऱ्यावर तलाठ्यांनी सही केलेली असते. ज्यावेळी बोगस 7/12 असतो तेव्हा त्यावर तलाठ्यांनी सही नसते. यावरून तुम्ही 7/12 उतारा खरा आहे की बोगस हे माहित करू शकता.
क्यूआर कोड (QR code)
डिजिटल इंडियाचे (Digital India) स्वप्न साकार होत असल्याचे आपण बघत आहोत. आता आधुनिक जगात अनेक बाबी डिजिटल होत आहे. घराचे, जमिनीचे किंवा कुठेलेही कागदपत्रे असो सध्या डिजिटलच मिळत आहे. आता जमिनीचा 7/12 देखील सध्या ऑनलाईन स्वरूपात मिळत आहे. ऑनलाइन 7/12 वर (Online 7/12) क्यूआर कोड दिलेला असतो, जर तुमच्या 7/12 उताऱ्यावर क्यूआर कोड दिला नसेल तर तुमचा 7/12 उतारा बोगस आहे असे लक्षात येते. हा कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला ओरिजिनल 7/12 मिळू शकेल.
LGD कोड व ई-महाभूमीचा लोगो (LGD code and E-Mahabhumi logo)
डिजिटलायझेशनमुळे प्रत्येक क्षेत्रात बदल घडून आले. त्याचबरोबर कृषि विषयक, जमीन विषयक बाबींमध्ये सुद्धा नवनवीन बदल आपल्याला दिसून येत आहे. आता नव्या बदलांनुसार 7/12 वर त्या गावचा युनिक कोड देण्यात येतो. जर हा कोड तुमच्या 7/12 वर असेल तरच तुमचा 7/12 खरा आहे असे समजा. 2 मार्च 2022 ला राज्य सरकारने सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा व ई-महाभुमी प्रकल्पाचा लोगो (Logo of E-Mahabhumi Project) टाकण्यासाठी मान्यता दिली आहे. जर तुमच्या 7/12वर हा लोगो असेल तर तुमचा 7/12 खरा आहे.याप्रकारे तुम्ही तुमचा 7/12 खरा आहे की खोटा हे चेक करू शकता.