जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना पसंती मिळत असताना एप्रिल महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत घसरण झाली आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये एप्रिल महिन्यात मासिक आधारावर 23 टक्क्यांनी घट दिसून आली. यात ओला वगळता इतर कंपन्यांच्या ई बाईक्सची मागणी कमी झाल्याचे दिसून आले. एप्रिल 2023 मध्ये ओला कंपनीने 22000 इलेक्ट्रिक स्कुटर्स विकल्या. देशात इलेक्ट्रिक स्कुटर्स विकणाऱ्या सर्व कंपन्यांनी एप्रिलमध्ये 66810 ई बाईक्सची विक्री केली. बजाज चेतक, टिव्हिएस, सिम्पल वन, एथर, ओकिनावा, हिरो या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटर्सच्या विक्रीत घसरण झाली.
एप्रिलमध्ये ओलाचा डंका
इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवणारी ओला कंपनी वगळता इतर सर्व मोठ्या दुचाकी कंपन्यांच्या विक्रीत एप्रिलमध्ये घट झाली आहे. ओला इलेक्ट्रिकने मासिक आधारावर विक्रीतील वाढ कायम ठेवली आहे. एप्रिल 2023 मध्ये ओलाने सुमारे 22000 इलेक्ट्रिक स्कुटर्स विकल्या आहेत. मार्चमध्ये ही संख्या 21390 होती. देशात इलेक्ट्रिक बाईक्स विकणाऱ्या सर्व कंपन्यांनी एप्रिलमध्ये 66810 इलेक्ट्रिक स्कुटर्स विकल्या आहेत.
इतर कंपन्यांची विक्री किती?
TVS च्या इलेक्ट्रिक स्कुटीच्या विक्रीबद्दल बोललो तर त्याची संख्या वेगाने घसरली आहे. TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटीची विक्री गेल्या 8 महिन्यांपासून वाढत होती परंतु एप्रिलमध्ये ती झपाट्याने घसरली आहे. एथर एनर्जी कंपनीच्या बाबतीतही असेच काहीसे दिसून आले आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये एप्रिलमध्ये मासिक आधारावर 23 टक्क्यांनी घट दिसून आली. ओकिनावा आणि हिरो इलेक्ट्रिकच्या ई-स्कूटींच्या विक्रीमध्ये या महिन्यात प्रचंड घट झाली, त्यामुळे विक्रीच्या अकड्यांमध्ये लक्षणीय परिणाम दिसून आला. बजाज चेतकची विक्री एप्रिल महिन्यात वाढून ती पाचव्या क्रमांकावर पोहचली. ओला इलेक्ट्रिकने आतापर्यंत 2.8 लाख इलेक्ट्रिक स्कुटर्स विकल्या आहेत. केवळ एप्रिल महिन्यात 22000 इलेक्ट्रिक स्कुटर्स विकून ओलाने 40 टक्के मार्केट काबीज केले. सरकारकडून ई बाईक्स तयार कंपन्यांना सबसिडीचा लाभ देण्यास दिरंगाई होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची विक्री कमी झाल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय अनियमित वीज पुरवठा, ई-बाईक्सच्या प्रचंड किंमती, उष्णतेमुळे होणारे बॅटरीचे स्फोट अशा कारणांमुळे देखील ई-स्कुटर्सच्या एकूण मागणीवर परिणाम झाला आहेय