सर्वसामान्यांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध मिळावी या हेतूने केंद्र सरकार गोल्ड कमाई योजनेंतर्गत सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23) खुली झाली आहे. आजपासून (20 जून 2022) पासून पाच दिवसांसाठी गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. यावेळी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची किंमत 5091 रुपये प्रति ग्राम (Sovereign gold bond scheme 2022-23 price) निश्चित केली आहे. गोल्ड योजनेत एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात कमीत-कमी 1 ग्राम ते जास्तीत जास्त 4 किलो पर्यंतचे सोन्याचे बॉण्ड खरेदी करू शकते. याशिवाय ट्रस्ट किंवा तत्सम संस्था 20 किलोपर्यंतचे रोखे खरेदी करू शकतात. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिक त्यांचे पैसे सोन्यात गुंतवून फायदे मिळवू शकतात.
गोल्ड बॉण्ड योजना काय आहे? What is Gold Bond Scheme?
गोल्ड बाँड योजना ही गोल्ड कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. भारत सरकारने 5 नोव्हेंबर 2015 पासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme) सुरु केली होती. गुंतवणूकदारांना पर्यायी आर्थिक मालमत्ता विकसित करण्यासाठी आणि भौतिक सोने खरेदीसाठी हि योजना महत्वपूर्ण आहे. गोल्ड बॉण्ड्स भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) जारी करतात आणि त्यांना सरकारीची हमी असते. आतापर्यंत आरबीआयने गोल्ड बॉण्ड्सचे आठ टप्पे जारी केले आहेत. या गोल्ड बॉण्ड्सची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीवर आधारित असते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज नुसार गोल्ड बॉन्ड ची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) सरकार सोन्याचे दर ठरवते. याशिवाय, या योजनेचा एक फायदा असा आहे की, यामध्ये सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या रकमेवर वार्षिक 2.50 टक्के निश्चित व्याजदर दिला जातो. हे व्याज सहामाही पद्धतीने गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाते.
दुसरी मालिका कधी उघडेल
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2022-23 ची दुसरी (Sovereign gold bond scheme 2022-23 next date ) मालिका 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान अर्जासाठी उपलब्ध असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारत सरकारच्या वतीने बाँड जारी करते. हे फक्त निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थांना विकले जाऊ शकतात. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 12,991 कोटी रुपयांच्या 10 टप्प्यांमध्ये जारी करण्यात आले होते.
गुंतवणूक कशी करायची
ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली आहे. यामध्ये बँक शाखा, पोस्ट ऑफिस, स्टॉक एक्सचेंज आणि स्टॉक होल्डिंग कॉपोरेशन ऑफ इंडियाद्वारे गुंतवणूक केली जाऊ शकते. यासाठी ज्याला कुणाला गुंतवणूक करायची असेल त्यांना एक अर्ज भरावा लागतो. यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील आणि हे बॉण्ड तुमच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य असून सर्व बँक,स्टॉक होल्डिंग कॉपोरेशन ऑफ इंडियालिमिटेड, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड मार्फतया बॉण्डची विक्री केली जाईल. तसेच डिजीटल माध्यमातून गोल्ड बॉण्ड खरेदीसाठी अर्ज करणाऱ्या आणि पेमेंट करणार्या गुंतवणूकदारांसाठी इश्यूच्या किमतीत 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट देण्यात आली आहे.
गोल्ड बॉण्डचा मॅच्युरिटी पिरिअड काय आहे?
बॉण्डचा परिपक्वता कालावधी (Maturity Period) आठ वर्षाचा असतो. परंतु गुंतवणूकदारांना पाच वर्षानंतर यामधून बाहेर पडण्याची संधी मिळते. तसेच जर आपल्याला पैसे काढायचे असतील तर तुम्ही ते पाच वर्षानंतर काढू शकता. जर तुम्हाला एखाद्या कर्ज घ्यायचे असेल तर कर्ज प्रक्रियेदरम्यान कॉलेटराल च्या रूपात तुम्हाला गोल्ड बॉण्डचा उपयोग होऊ शकतो.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि विशेषकरून सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ही एक उत्तम संधी ठरू शकते.