Salary planning with financial discipline: हे वर्ष संपायला अगदी काही दिवसचं उरले आहेत. बऱ्याच वेळेला पगार(Salary) आला की लगेच संपतो अशी अनेकांची गत होते. त्यामुळे काही सवयी या योग्य वेळी अंगवळणी पाडायला हव्यात. नव्या वर्षात काही चांगल्या सवयी आपल्या अंगी लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फायनान्शियल डिसिप्लिन(Financial Discipline) म्हणजे एक प्रकारची शिस्त लावून नवीन वर्षात पगाराचं नियोजन करायला हवं.
जर तुम्हीही तुमच्या पगाराचं योग्य नियोजन केलं नाही तर तुमचं दीर्घकाळासाठी मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नवीन वर्षात वर्षात पगारासोबत काही शिस्तीच्या गोष्टी अंगी बाळगायला हव्यात. ज्यामुळे तुमचं भविष्य सुरळीत आणि अधिक सुरक्षित राहू शकेल. पण हे नक्की कसं करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजचा लेख हा तुमच्यासाठी.
योग्य पद्धतीने नियोजन कसं करायचं?(How to plan properly?)
SBI ने याबाबत ट्विटरवर(Twitter) ग्राहकांना मार्गदर्शन करणारी महत्त्वाची माहिती पोस्ट केली आहे. योग्य पद्धतीने पैशांचं नियोजन कसं करायचं याचा सल्ला SBI ने ग्राहकांना दिला आहे.
- तुम्ही तुमची पेमेंट प्रोसेस(Payment Process) नीट ठेवा आणि त्यामध्ये कोणताही घोळ घालू नका
- तुमच्या पगारापेक्षा जास्त मोठा EMI घेऊ नका. त्यामुळे तुमच्यावर आर्थिक बोजा वाढू शकतो आणि तुमच्या हातात पैसे शिल्लक उरणार नाहीत
- सगळे पेमेंट(Payment) योग्य वेळेत करा ज्यामुळे तुम्हाला लेट चार्ज(Late Charge) लागू होणार नाही
- तुमच्याकडून पेमेंट उशिरा करण्यात आलं तर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रिवर(Credit history) त्याचा वाईट परिणाम दिसून येतो त्यामुळे क्रेडिट स्कोअर निगेटिव्ह होऊन देऊ नका
- क्रेडिट स्कोअर(Credit Score) चांगला असेल तर तुम्हाला बँक सहज लोन देते अन्यथा लोन घेण्यात अडचणी निर्माण होतात
- योग्य वेळेत तुम्हाला आलेली बिल(On Time Billing) भरली तर त्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली राहाते
- तुमचा क्रेडिट स्कोअर जेवढा चांगला तेवढं जास्त आणि लगेच लोन(Loan) मिळण्याच्या शक्यता असतात त्यामुळे ही काळजी नेहमी घ्या