टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीचा (TV actress Rupali Ganguly) मोठा चाहता वर्ग आहे. ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली ही भारतीय टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली असल्याची चर्चा आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. पण या बातमीत किती तथ्य आहे? हे मात्र सांगता येणार नाही. अभिनेत्री रुपाली गांगुली जर खरच जास्त मानधन आकारत असेल तर त्यामध्ये कोणतेही आश्चर्य मानण्याचे कारण नाही. कारण ती मागील अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये (TV Industry) काम करत आहे. आपल्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
मोठ्या-मोठ्या स्टार्सना टाकले मागे
अभिनेत्री रुपाली गांगुलीने मानधनाच्या बाबतीत अनेक मोठ्या कलाकारांना मागे टाकले आहे. बॉलिवूड लाईफने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार रुपाली गांगुली सुरुवातीला दिवसाला 1.5 लाख रुपये मानधन आकारत होती. पण आता अभिनेत्री रुपाली गांगुली दिवसाला तीन लाख रुपये मानधन आकारते. यामुळे अभिनेत्री रुपाली गांगुली इंडियन टेलिव्हिजन क्षेत्रात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. एवढेच नाही तर मानधनाच्या बाबतीत रुपालीने अनेक टीव्ही अभिनेत्रींना मागे टाकले आहे. अभिनेत्रीच नव्हे तर मोठ-मोठे अभिनेते जसे की अभिनेता राम कपूर, रोनित रॉय यांना देखील मानधनाच्या बाबतीत रुपाली गांगुलीने मागे टाकले आहे. असे मानण्यात येते की काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री रुपाली गांगुलीने तिची फी वाढवली आहे.
अनुपमातील को-स्टार्सना मिळते एवढी रक्कम
बातम्यांमधील माहितीनुसार स्टार प्लसवरील ‘अनुपमा’ या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुलीसोबत काम करणाऱ्या तिच्या को-स्टार्सना दिवसाला जवळपास 1.5 लाख रुपये मानधन मिळत आहे. यामध्ये तिचा को-स्टार अभिनेता गौरव खन्ना आणि अभिनेता सुधांशू पांडे यांचा समावेश आहे.
टीआरपीमध्ये ‘अनुपमा’ची धम्माल
स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली ही अनुपमा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रुपाली गांगुलीची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत धम्माल उडवून देत आहे. जेव्हापासून ही मालिका ऑन एअर आहे तेव्हापासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. राजन शाही यांच्या अनुपमा या मालिकेने टीव्ही क्वीन एकता कपूरच्या अनेक मोठ्या मोठ्या मालिकांना पिछाडीवर टाकले आहे. ‘अनुपमा’ मालिका हिट ठरण्यामागे मालिकेतील कलाकारांच्या चांगल्या अभिनयासोबतच क्रिएटर्सची मेहनत हे एक कारण ठरत आहे.