• 05 Feb, 2023 13:16

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TV Industry: मालिकेच्या एका एपिसोडमधून चॅनल 1 कोटी रुपये कमावते!

How much money do TV channels earn from showing serials?

मोबाईल हातात असला तरी टिव्ही बघणे बंद झालेले नाही. टिव्हीवर ज्या मालिका प्रदर्शित होतात, त्यामधून टिव्ही चॅनलला किती पैसे मिळतात, हे जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

आजच्या इंटरनेटच्या जगात, अजूनही टिव्ही हे मनोरंजनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. टिव्ही संचाला घरातील सदस्यही मानले जाते. टिव्हीवर आपण अनेक मालिका, रिअॅलिटी शोज पाहिले आहेत, त्यातील अॅक्टर किंवा अॅक्ट्रेसला किती पैसे मिळतात हे जाणून घेतले आहे. मालिका आणि रिअॅलिटी शोज हे चॅनल बनवत नाहीत, तर ते प्रोडक्शन हाऊस बनवतात. तर चॅनल हे केवळ ती कलाकृती दाखवण्याचे माध्यम आहे. या माध्यमाला विविध प्रकारे पैसे मिळतात.

चॅनलला प्रति सेकंदाचे किती पैसे मिळतात? (How much channel earn per second?)

टिव्ही चॅनल पाहण्यासाठी आपण रिचार्ज करतो, यातून चॅनलला उत्पन्न मिळत असावे, असे अनेकांना वाटते. मात्र त्या पैशांमध्ये चॅनलचा खर्चही भागत नाही. गंमत म्हणजे, आपण जी अर्ध्या तासाची मालिका पाहतो, त्यामधून चॅनलला 50 लाख ते 1 कोटींची कमाई होते. ही कमाई जाहिरातींच्या माध्यमातून होते. मालिका बनवण्यासाठी चॅनल प्रॉडक्शन हाऊसला पैसे देते. तर, काहीवेळा चॅनल आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये करार होतो. ते अर्धे - अर्धे पैसे मालिकेवर लावतात आणि नंतर विविध माध्यमातून येणाऱ्या पैशांची वाटाघाटी करतात. पुढे मालिका बनल्यावर आणि ती टिव्हीवर दिसू लागल्यावर, मालिकेच्या टीआरपीवर अवलंबून असते की ही मालिका चॅनलला किती पैसे कमावून देणार. कारण जेवढी टिआरपी तेवढ्या अधिक जाहिराती आणि स्पॉन्सर्स मिळतात. जर चॅनल दररोज 30 मिनिटांची मालिका प्रसारित करत असेल तर त्यात 10 ते 15 मिनिटांच्या जाहिराती समाविष्ट केल्या जातात.  चॅनल या जाहिरातींचे दर प्रति सेकंद ठरवते. जर आपण वर्तमानाबद्दल बोललो तर, नॅशनल ए ग्रेड टिव्ही चॅनल त्यांच्या प्राईम टाईमच्या जाहिरातीच्या प्रति सेंकदाला 6 हजार ते 10 हजार रुपये आकारतात. यातही दर आठवड्याला बीएआरसीच्या अहवालानुसार, टिआरपी रेटिंग येते त्यानुसार ही रक्कम बदलत असते. एकूण अर्ध्या तासातल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये चॅनल 1 कोटींपर्यंत कमाई करते. मात्र सर्वच चॅनल एवढी कमाई करत नाहीत मात्र 50 ते 60 लाख कमावतात. 

आपण ज्या चॅनलवर मालिका पाहतो त्याला जनरल एंटरटेन्मेंट चॅनल असे म्हणतात. इतर चॅनल मध्ये न्यूझ, ट्रॅव्हल, म्युझिक, फूड, माहिती-विज्ञान-तंत्रज्ञान आदी नीश अर्थात एकाच विषयाला वाहिलेली चॅनल्स असतात. त्यांच्या जाहिरातींच्या किंमती वेगळ्या असतात. विशेषत: न्यूझ चॅनलच्या जाहिरातींच्या किंमती वेगळ्या असतात. मालिकांमधून प्रत्येकवेळी चॅनलला बक्कळ पैसे मिळतात असे नाही, एखादी हिट आणि टिआरपीमध्ये पहिल्या पाचात असलेल्या मालिकेच्या बळावर चॅनला महत्त्वाचा खर्च निघत असतो, अर्थात या सगळ्यातून मोठा नफाही मिळतो. मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील दर हिंदीपेक्षा कमी असतात, प्राईम टाईला 5 ते 8 हजारांपर्यंत दर मिळतो. तर काही रिअॅलिटी शोज किंवा मालिका ज्या हिंदीपेक्षाही जास्त गाजतात त्यात जाहिरात दाखवण्यासाठी प्रति सेकंदाचा दर 12 हजारांपर्यंत जातो.

पैसे कमावण्याची इतर माध्यमे (Other means of earning money)

सध्या मालिका येण्यापूर्वी त्याचे महिनाभर किंवा तीन महिन्यांपासून प्रमोशन केले जाते. मालिकेबद्दलची चर्चा वाढवली जाते, जेणेकरून सुरुवातीपासूनच मालिकेला चांगल्या जाहिराती मिळाव्यात आणि मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी जेणेकरून टिआरपी मिळेल. तसेच आजकाल रिअॅलिटी शोप्रमाणे, मालिकेलाही टायटल  स्पॉन्सर घेतले जातात. यानिमित्तानेही चॅनलची कमाई होते. तसेच चॅनल कमाईसाठी इतर मार्ग म्हणून विविध कार्यक्रम भरवतात, त्यात नववर्ष, दिवाळी, होळी आदी सणांचे निमित्त साधून मालिकेतील कलाकारांसह कार्यक्रम करतात. यात मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशीप आणि जाहिराती घेतल्या जातात. तसेच अवॉर्ड फंक्शनच्या माध्यमातूनही अशाप्रकारची कमाई केली जाते. यासोबतच काही डॉक्युमेंट्री, इतर वृत्तपत्र किंवा मासिकांच्या अवॉर्ड फंक्शन प्रदर्शित करूनही चॅनलला पैसे मिळतात.