Pune Ring Road: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने(Maharashtra State Road Development Corporation) प्रस्तावित केलेल्या रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाची पूर्वतयारी वेगाने सुरू झाली आहे. त्यासाठी मावळ(Maval) आणि मुळशी(Mulashi) तालुक्यातील 26 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. 2023 या चालू वर्षात भूसंपादन पूर्ण करून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चला तर पुण्यातील रिंग रोड(Ring Road) प्रकल्पाबाबत जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
भूसंपादनात किती गावांचा समावेश करण्यात आला आहे?
पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी MSRDC ने 172 किमी लांब आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे. या रस्त्याचे पूर्व(east) आणि पश्चिम(West) असे दोन भाग करण्यात आले असून पूर्व भागात मावळातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश करण्यात आला आहे, तर पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळातील 6 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 695 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागेल व त्यानुसार जमिनींच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पार पाडली जाईल.
भूसंपादन करताना शेतकऱ्यांचा केला जातोय विचार
मावळ आणि मुळशी दोन्ही तालुक्यांतील 26 गावांत भूसंपादन करण्यात येणार आहे. या गावातील जमिनींचे मुल्याकंन निश्चित करण्यात आले आहे. हे मुल्यांकन निश्चित करताना जागा मालकांना विचारात घेऊन ते पूर्ण करण्यात आले असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून भूसंपादन करण्यात येणाऱ्या प्रत्येक जमीननिहाय स्वतंत्र मुल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील भूसंपादन सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आली असल्याचे संदेश शिर्के यांनी सांगितले आहे.
गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून निधीस मंजुरी
हा प्रकल्प उभारण्यासाठी 22,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून 11,000कोटी रुपये कर्ज देण्यास गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाने(Housing and Urban Development Corporation) मान्यता दिली आहे. गरज पडल्यास गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून(Housing and Urban Development Corporation) वाढीव तरतुदीनुसार अधिक रकमेची मागणी करण्यात येणार आहे.
एप्रिलपासून प्रत्यक्ष कामास सुरूवात
रिंग रोडच्या भूसंपादनासाठी विभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली जाईल. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. येत्या मार्चपर्यंत भूसंपादनाचे काम पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल व त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे रस्ते महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहूल वसईकर(Rahul Vasaikar) यांनी सांगितले आहे.