Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Richest Indian Women: ‘या’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

Richest Indian Women

Image Source : https://www.freepik.com/

वर्ष 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीय व्यक्तींमध्ये 9 महिलांचा समावेश होता. भारतातील अब्जाधीश महिलांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सर्वात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत कोणाचा समावेश आहे, त्याबाबत जाणून घ्या.

भारतातील अब्जाधीशांचा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीमध्ये अनेक नवीन नावे जोडली जात आहे. या यादीमध्ये महिलांचा देखील मोठ्याप्रमाणात समावेश आहे. फॉर्ब्स इंडियानुसार वर्ष 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीय व्यक्तींमध्ये 9 महिलांचा समावेश आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे ? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.

सावित्री जिंदल

सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये सावित्री जिंदल या टॉपवर आहे. 73 वर्षीय सावित्री जिंदल या ओपी जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. 2005 साली पतीच्या निधनानंतर त्यांनी कंपनीचा कारभार आपल्या हाती घेतला. फॉर्ब्स इंडियाच्या त्यांची संपत्ती तब्बल 24 अब्ज डॉलर्स एवढी आहे. विशेष म्हणजे वर्ष 2023 मधील टॉप-10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील त्या एकमेव महिला आहेत. त्यांनी याआधी विधानसभा निवडणूक देखील लढवली असून, 2013 साली हरयाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या.

रोहिका सायरस मिस्त्री

56 वर्षी रोहिका सायरस मिस्त्री या श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती तब्बल 8.2 अब्ज डॉलर्स एवढी आहे. रोहिका या दिवगंत सायरस मिस्त्री यांच्या पत्नी व दिवगंत उद्योगपती पालोनजी मिस्त्री यांच्या सून आहेत. त्यांचीटाटा सन्समध्ये जवळपास 18.4 टक्के हिस्सेदारी आहे. 

रेखा झुनझुनवाला

श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती 7.6 अब्ज डॉलर्स एवढी आहे. 59 वर्षीय रेखा या दिवगंत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. राकेश झुनझुनवाला यांचे वर्ष 2022 मध्ये निधन झाले होते. रेखा यांनी टायटन, टाटा मोटर्स सारख्या जवळपास 29 मोठ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.

लीना गांधी तिवारी

लीना गांधी तिवारी या  USV या जागतिक फार्मास्युटिकल आणि बायोटेक कंपनीच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या संपत्तीचा आकडा तब्बल 4.8 अब्ज डॉलर्स एवढा आहे.  USV फार्मा कंपनीची स्थापना त्यांचे वडील विठ्ठल गांधी यांनी वर्ष 1961 मध्ये केली होती. ही कंपनी मधुमेह व ह्रदयाशी संबंधित आजारावरील औषधे तयार करते. 2018 साली  USV ने जर्मन कंपनी  Juta Pharma ला खरेदी केले होते.

विनोद राय गुप्ता

सर्वात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीमध्ये 59 वर्षीय विनोद राय गुप्ता या पाचव्या स्थानी आहेत. विनोद राय गुप्ता व त्यांचा मुलगा अनिल राय गुप्ता हे  Havells India ही कंपनी चालवतात. जवळपास 50 देशांमध्ये या कंपनीने उत्पादनाचे जाळे पसरवले आहे. फॉर्ब्स इंडियाच्या रिपोर्टनुसार, विनोद राय गुप्ता यांची संपत्ती 4.3 अब्ज डॉलर्स एवढी आहे.