Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Plans Tips: निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद कशी करायची?

Retirement plans Tips

Retirement Plans Tips: जोपर्यंत मनुष्याची मिळकत सुरु असते; तोपर्यंत सगळे ठिक असते. मात्र जेव्हा उत्पन्नाचा स्त्रोत बंद होतो, तेव्हा काय? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. यासाठी पुरेशी तरतूद करणे गरजेचे आहे. ती कशी असायला हवी; याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Retirement Plans Tips: तुमची सेवानिवृत्ती जवळ येत आहे; त्यामुळे भविष्यात तुमच्याकडे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत कदाचित उपलब्ध असणार नाही. त्यामुळे निवृत्तीनंतरचा तुमचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा सेवानिवृत्ती निधी उपलब्ध असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा खर्च आणि कौटुंबिक परिस्थिती वेगवेगळी असते. म्हणून, निवृत्तीनंतर लागणाऱ्या पैशांची गरज प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. आज आपण सेवानिवृत्ती निधीचे नियोजन करण्याचे महत्त्व जाणून घेऊया.

निवृत्तीनंतरच्या खर्चाचा अंदाज घ्या 

निवृत्त जीवनाचे सत्य हे आहे की, त्या दिवसांत नियमित उत्पन्न मिळत नाही, ते थांबलेले असते.  पण त्या काळातला खर्च मात्र थांबलेला नसतो. सेवानिवृत्तीच्या मुख्य खर्चामध्ये मासिक घरगुती खर्च, वैद्यकीय खर्च, सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणे किंवा कौटुंबिक कार्यक्रम इत्यादींचा समावेश असतो. शिवाय ज्या व्यक्तीची जशी जीवनशैली असते, त्यावरही त्याचा बराचसा खर्च अवलंबून असतो. भविष्यातील खर्चाची तरतूद काळजीपूर्वक करणे आणि वर्तमानात व्यक्ती काम करीत असतांना निवृत्तीनंतरची योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे आहे.

खर्च आणि बचत यांचा मेळ घाला

सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती असते की, सुरुवातीच्या म्हणजे तरुणवयात जास्त खर्च केला जातो. तेव्हा कमाई करीत असतानाच अनावश्यक खर्च टाळून, भविष्यातील आणि निवृत्तीनंतरची तरतूद करणे शिकले पाहिजे. ज्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत नसताना किंवा निवृत्तीनंतर नवीन उत्पन्नाचा स्त्रोत तयार करायला, आजचा पैसा उद्या उपयोगात येऊ शकेल.

वाढत्या महागाईवर लक्ष ठेवा

महागाईचा निवृत्तीच्या नियोजनावर मोठा परिणाम होतो. निवृत्त झाल्यावर निश्चित परतावा मिळविण्यासाठी, लोक सहसा दीर्घ मुदतीसाठी पैसे गुंतवतात. पण महागाई वाढतच जाते आणि प्रत्यक्षात मात्र आपले उत्पन्न तेवढेच राहते. एखाद्या व्यक्तीने अशाप्रकारे गुंतवणूक करावी की तो महागाईच्या प्रभावापासून स्वत:चा बचाव करू शकेल. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईचा प्रभाव आपल्यावर भविष्यात होऊ नये किंवा निवृत्तीनंतर त्याची झळ आपल्याला बसू नये. यासाठी योग्य सल्ला घेऊन आपण इक्विटी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो.

गुंतवणुकीची योग्य पद्धत वापरा

सेवानिवृत्तीमध्ये चांगला निधी उपलब्ध व्हावा यासाठी गुंतवणुकीचे योग्य आणि नवनवीन  मार्ग शोधता आले पाहिजेत. मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आणि साधने उपलब्ध आहेत. जिथे एखादी व्यक्ती निवृत्तीपर्यंत नियमितपणे पैसे ठेवू शकते. पण अशापद्धतीने पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही किती जोखीम उचलू शकता हे ठरवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. निवृत्तीदरम्यान निश्चित परतावा मिळविण्यासाठी पैसे गुंतवण्याचे काही शाश्वत मार्ग जाणून घेणे गरजेचे आहे.