सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयानं कन्झ्युमर प्राइज इंडेक्सवर (Consumer Price Index) आधारित रिटेल इन्फ्लेशनचे आकडे जाहीर केले. मागच्या महिन्यात म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23च्या मार्चमध्ये ते 6 टक्क्यांनी खाली आले आहे. ही मागच्या 15 महिन्यांतली निचांकी आकडेवारी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मागच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023मध्ये किरकोळ महागाईचा दर (Inflation rate) 5.66 टक्के होता. त्याआधी 15 महिने म्हणजेच डिसेंबर 2021 नंतरची ही निचांकी पातळी आहे. भाजीपाला तसंच खाद्यपदार्थांच्या दरात झालेली घट हे त्याचं मुख्य कारण दिसतंय. दुसरीकडे या काळात धान्याच्या दरात मात्र वाढ झाल्याचं समोर आलंय. या वस्तूंचा महागाई दर 15.27 टक्क्यांवर होता. टीव्ही 9नं याविषयीचं वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
कमाल आणि किमान दर किती?
महागाईचा दर 4 टक्के असायला हवा, अशाप्रकारचे आदेश आरबीआयला मिळालेत. त्या पार्श्वभूमीवर कमाल आणि किमान दर आरबीआयनं निश्चित केलाय. किमान 2 टक्के आणि कमाल 6 टक्के अशी आरबीआयकडून मर्यादा निश्चित करण्यात आलीय. हा विचार करता मार्च 2023मध्ये हा दर 5.66 टक्क्यांवर आहे. मागच्या वर्षी म्हणजेच मार्च 2022मध्ये हा दर 6.95 टक्के होता.
शहर, ग्रामीण स्तर
देशातली अर्थव्यवस्था प्रामुख्यानं शहर आणि ग्रामीण अशा दोन भागात विभागली गेलीय. या दोन्हीचा स्वतंत्रही विचार करता येवू शकतो. त्याप्रमाणं शहर आणि गाव पातळीवर स्वतंत्रपणे पाहिलं तर मार्च 2023मधली आकडेवारी पाहू. शहर पातळीवर किरकोळ महागाई दर 5.89 टक्के आणि ग्रामीण पातळीवर 5.51 टक्के होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये तो दर अनुक्रमे 6.12 टक्के आणि 7.66 टक्के होता. फेब्रुवारी 2023मध्ये शहरांमध्ये महागाई दर 6.10 टक्के आणि ग्रामीण पातळीवर 6.72 टक्के राहिला.
आरबीआयच्या मर्यादेपेक्षा अधिक दर
आरबीआयनं दराची मर्यादा ठरवली असली तरी यात उच्चांकही झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये महागाई दर 7.79 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.तर 2023च्या पहिल्या दोन महिन्यांत जानेवारीमध्ये 6.52 टक्के आणि फेब्रुवारीमध्ये 6.44 टक्के राहिला होता. म्हणजे आरबीआयच्या मर्यादेच्याही तो वर होता.
किरकोळ चलनवाढीचा दर जास्तच
किरकोळ चलनवाढीचा दरही वर राहिल्याचं आकडेवारीवरून दिसतं. सलग तीन तिमाहीत तो 6 टक्क्यांपेक्षा जस्त राहिलाय. नोव्हेंबर 2022मध्ये मात्र तो 5.88 टक्क्यांवर आला होत. डिसेंबर 2021मध्ये तो 5.66 टक्के इतका राहिला होता.
खाद्यपदार्थांची महागाई कमी झाली
ग्राहक किंमत निर्देशांकात जेव्हा महागाईचा विचार केला जातो, तेव्हा त्यात फूड बास्केटचा मोठा वाटा असतो. फूड बास्केटमधली महागाई मोजण्यासाठी कन्झ्युमर फूड प्राइज इंडेक्स तयार केली जाते. यानुसार मार्च 2023मध्ये अन्नधान्य महागाईचा दर 4.79 टक्के होता. मार्च 2022मध्ये 7.68 टक्के होता. तर फेब्रुवारीमध्ये हा आकडा 5.95 टक्के राहिला होता.
अन्नधान्य महागाईचा दर
अन्नधान्य महागाईचा दर शहर आणि ग्रामीण स्तरावरही पाहता येईल. शहरात 4.82 टक्के आणि ग्रामीण भागात तो 4.66 टक्के होता. मार्च 2022मध्ये तो शहरांमध्ये 7.04 टक्के आणि ग्रामीण भागात 8.04 टक्के होता. फेब्रुवारी 2023मध्ये तो 5.09 (शहरी) आणि 6.60 (ग्रामीण) टक्के राहिला होता.