Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Inflation rate 11 महिन्यातील निच्चांकी पातळीवर, महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा

Inflation rate

गेल्या 11 महिन्यातील महागाईचा दर निच्चांकी पातळीवर गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.88% इतका नोंदण्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलेनत देखील महागाई दरामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 11 महिन्यातील महागाईचा दर  निच्चांकी पातळीवर गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.88% इतका नोंदण्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलेनत देखील महागाई दरामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

गेल्या महिन्यात असा होता Inflation rate 

सप्टेंबर मध्ये महागाई दर 7.44 टक्के इतका होता. या तुलनेत ऑक्टोबरमध्येच घट झाली होती. ऑक्टोबरमध्ये हा दर 6.77 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये हा दर आणखी कमी झाला आहे. या वर्षभरात हा दर निच्चांकी पातळीवर गेला असला तरी गेल्या महिन्यातील नोव्हेंबर महिन्याशी देखील याची तुलना करणे आवश्यक ठरते. नोव्हेंबर 2021 मध्ये हा दर 4.91 टक्के इतका नोंदवण्यात आला होता

भाजीपाला, डाळींचे भाव झाले कमी 

भाजीपाला, डाळी अशा खाद्यपदार्थांच्या किमती घासरल्या आहेत. याचा महागाईवर सकारात्मक परिणाम झाला आहे.  ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमधील अन्नधान्यांच्या महागाई दरात मोठी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 7.01 टक्के असणारा हा दर  नोव्हेंबरमध्ये 4.67 टक्क्यापर्यंत घसरला आहे. भाज्यांच्या महागाईमध्ये देखील मोठी घट झाली आहे. 

महागाईचा आपल्या खरेदीशक्तीवर परिणाम होतो.  महागाईमुळे आपली क्रयशक्ती घटते.  महागाई दर जर 5 टक्के असेल तर आपल्या 100 रुपयाची क्रयशक्ती 95 रुपये इतकीच राहते. यामुळे महागाईचा आपल्या राहणीमानावर परिणाम होतो.  

महागाई (inflation) नियंत्रित करण्यासाठी काय केले जाते?

महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न केले जातात. मार्केटमधील पैशाचा प्रवाह रोखणे चलनवाढ कमी करण्यासाठी आवश्यक असते. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) रेपो दरात वाढ केली जाते. अलीकडे RBI ला वारंवार हा निर्णय घ्यावा लागत आहे. नुकताच 5.90 टक्क्यावरून 6.25 टक्के इतकी रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. 

वाढती महागाई हा कायमच चिंतेचा विषय असतो. याचा सर्वसामान्यांच्या मासिक बजेटवर परिणाम होत असतो. मात्र 11 महिन्यातील महागाई दराचा निच्चांक  नोव्हेंबरमध्ये नोंदण्यात आल्यामुळे हा काहीसा दिलासा मिळाला आहे.