Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Republic Day Special Sale: फक्त 26 रुपयांत खरेदी करा इअरबड्स, मूळ किंमत आहे 1,299 रुपये

Republic Day Special Sale

Republic Day Special Sale: लावा प्रोबड्स 21 (Lava Probuds 21) हे इअरबड्स तुम्ही फक्त 26 रुपयांत खरेदी करू शकता. याची बाजारातील किंमत 1,299 रुपये आहे. हा इअरबड्स 26 रुपयांत कसा मिळेल हे जाणून घेऊ.

Republic Day Special Sale: रिपब्लिक डे निमित्त लावा कंपनीचा इअरबड्स ब्रॅण्ड Probudsने ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. ही ऑफर रिपब्लिक डे स्पेशल सेल पुरतीच आहे. या सेलमध्ये लावा कंपनीचा Earbuds Probuds 21 फक्त 26 रुपयांना खरेदी करता येणार आहे. लावा कंपनीचे नवीन आलेले वायरलेस True Wireless Buds फक्त 26 रुपयांमध्ये मिळणार आहेत. पण स्टॉक असेपर्यंतच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

भारताच्या रिपब्लिक डे (प्रजासत्ताक दिन) निमित्त ग्राहकांना लावा कंपनीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लावा स्टोअरमधून Probuds 21 Earbuds खरेदी करता येणार आहेत. तसेच ॲमेझॉनवरूनही हे इअरबड्स विकता घेता येतील. Probuds 21 खरेदी करण्याचा सेल 26 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. याची विक्री मर्यादित असून स्टॉक उपलब्ध असेपर्यंत ग्राहकांना हे इअरबड्स 26 रुपयांत खरेदी करता येतील.

Lava Probuds 21 मध्ये काय फीचर्स आहेत?

Lava Probuds 21 या इअरबड्समध्ये 60mAh ची बॅटर देण्यात आली आहे. जी ग्राहक 45 तास वापरू शकतात. तसेच यामध्ये 75ms अल्ट्रा-लो लेटेंसीसह गेमिंगचा चांगला अनुभव घेता येईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. यामध्ये 12mm च्या डायनामिक ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. तसेच IPX4 रेटिंग देण्यात आली आहे. Probuds 21 मध्ये वेक आणि पेअर फीचरसुद्धा देण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये व्हॉईस असिस्टंट फीचर सुद्धा दिले आहे. ज्याचा वापर करून युझर्स बोलून कोणतीही कमांड देऊ शकतात. हे इअरबड्स ब्लॅक, ग्लेशिअर ब्लॅक, सनसेट रेट आणि ओशिअन ब्ल्यू रंगात उपलब्ध आहेत.

lava probuds 21-1
Source: www.lavamobiles.com/

Lava Probuds 21 ची मूळ किंमत काय आहे?

Lava Probuds 21 या इअरबड्सची मूळ किंमत 1,299 रुपये इतकी आहे. याच्यासोबत 1 वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी सुद्धा दिली जाते. या ऑफर्स व्यतिरिक्त काही इतर ई-कॉमर्स वेबसाईटवर Lava ProBuds 21 हे इअरबड्स 999 रुपयांमध्ये ही उपलब्ध आहेत.

Lava Probuds 21 कधी आणि कुठे बुक करता येणार?

Lava Probuds 21 हे इअरबड्स सेलनिमित्त 26 जानेवारी, 2023 रोजी दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होतील. याची विक्री मर्यादित असून स्टॉक असेपर्यंतच ग्राहकांना हे इअरबड्स 26 रुपयांत खरेदी करता येतील. लावा कंपनीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लावा स्टोअरमधून आणि ॲमेझॉनवरून Probuds 21 Earbuds खरेदी करता येतील.