Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Repo Rate Hike : जाणून घ्या, तुमच्या गृहकर्जाचा EMI किती वाढेल

Repo Rate Hike : जाणून घ्या, तुमच्या गृहकर्जाचा EMI किती वाढेल

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) बदलती आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ केली. रेपो दरात वाढ म्हणजे कर्जाच्या व्याजात वाढ, विशेषत: गृहकर्जात. गृहकर्जावरील व्याजदर रेपो दरासारखे एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेले असतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 4 मे 2022 रोजी रेपो दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. मुदत ठेव (Fixed Deposit) गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे; कारण मुदत ठेव गुंतवणूक दरांवरील व्याजदर वाढतच जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरबीआयने रेपो दरात केलेली वाढ ही कर्जदारांसाठी, विशेषत: गृहकर्ज घेणार्‍यांसाठी आर्थिक धक्काच असतो. कारण रेपो दरात वाढ म्हणजे गृहकर्जाच्या व्याजदरात आणि थेट तुमच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ. वेगवेगळ्या कर्जाच्या रकमेचा ईएमआय कसा वाढू शकतो, ते पाहू.

30-lakh-home-loan.jpg
50-lakh-home-loan.jpg
75-lakh-home-loan.jpg

इथे देण्यात आलेले व्याजदर हे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वेबसाइटवरून घेण्यात आलेले आहेत. बिगर-महिला पगारदार असलेल्या ज्याचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) 750-799 च्या श्रेणीतील आहे आणि व्याज दर नियमित एसबीआय मुदत कर्जासाठीचे आहेत.

गृहकर्जाच्या व्याजदरांबद्दल आरबीआयचे नियम काय सांगतात?

ऑक्टोबर, 2019 पासून आरबीआयने (RBI) गृहकर्जाच्या व्याजदरांशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार, बँकांना त्यांच्या गृहकर्जाचे व्याजदर एक्सटर्नल बेंचमार्कशी (External Benchmark) जोडणे आवश्यक आहे. बँका खालीलपैकी कोणतेही एक एक्सटर्नल बेंचमार्क निवडू शकतात.

अ) आरबीआयचा रेपो दर (RBI Repo Rate)
ब) फायनान्शियल बेंचमार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FBIL) द्वारा प्रकाशित भारत सरकारचे 3 महिन्यांचे ट्रेझरी बिल उत्पन्न.
क) एफबीआयएल (FBIL) द्वारे प्रकाशित भारत सरकारचे 6 महिन्यांचे ट्रेझरी बिल उत्पन्न
ड) एफबीआयएल (FBIL) द्वारे प्रकाशित केलेले इतर कोणतेही बेंचमार्क व्याजदर

वैयक्तिक किंवा किरकोळ कर्जावर आकारला जाणारा अंतिम व्याज दर खालीलप्रमाणे काढला जातो.
एक्सटर्नल बेंचमार्क दर (वरीलपैकी कोणतेही एक) + मार्जिन + जोखीम प्रीमियम.

दरम्यान, बँकांना एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जावरील व्याजदरांचे पुनरावलोकन आणि सुधारणा दर तीन महिन्यांत एकदा करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे, एक्सटर्नल बेंचमार्क दरात कोणतीही वाढ केल्यास तीन महिन्यांत गृहकर्जाच्या व्याजदरातही वाढ होईल.

Image Source - https://bit.ly/3yzOCTx