येत्या काही दिवसांत फॅशनच्या दुनियेत आता नवा धमाका पाहायला मिळणार आहे. याचे कारण म्हणजे Yousta नावाने रिलायन्स रिटेलने एक नवा फॅशन ब्रांड सुरु केलाय. होय, ‘रिलायन्स ट्रेंड’ नावाने आधीच क्लोथिंग मार्केटमध्ये असलेल्या रिलायन्सने आता नवा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतलाय.रिलायन्सने त्यांचे पहिले स्टोअर हैद्राबाद येथे सुरु केले असून लवकरच देशभरात याचे स्टोअर्स सुरु केले जातील असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
युवकांना डोळ्यासमोर ठेऊन रिलायन्सने हा ब्रांड बाजारात आणला आहे. टाटा उद्योगसमूहाच्या Zudio या ब्रांडला टक्कर देण्यासाठी हा ब्रांड आणला असल्याचे म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे तरुणाईमध्ये Zudio ची चांगलीच क्रेझ आहे. स्वस्तात मस्त फॅशन आउटफिट खरेदी करण्याचे Zudio हे तरुणाईचे आवडीचे स्टोअर बनले आहे. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय फॅशन ट्रेंडचे आउटफिट Zudio मध्ये खरेदी करता येतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन रिलायन्सने Yousta हा फॅशन ब्रांड लाँच केलाय.
? Reliance Retail launches a new range of stores 'Yousta'.
— Sagar Bhalerao (@SagarMahamoney) August 25, 2023
It is focused at the youth and will have all products priced below Rs 999.#Yousta #RelianceIndustries pic.twitter.com/fw46CfjCIz
परवडणाऱ्या दरात फॅशन
‘झुडीयो’ प्रमाणेच अगदी स्वस्त दरात तरुण मुला-मुलींचे कपडे Yousta येथे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या फॅशन आउटफिट स्टोअरमध्ये 499 रुपयांच्या आत शर्ट, टी-शर्ट, जीन्स, ओवरसाईज टी-शर्ट, सूज, अंडर गारमेंट खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर नव्या ट्रेंडमधील ॲक्सेसरीज देखील तरुणाईला खरेदी करता येणार आहे. स्टोअर्समधील इतर उत्पादने देखील 999 रुपयांच्या आतच आहेत.
Yousta स्टोअर्सची वैशिष्ट्ये
Yousta स्टोअर्स हाय-टेक करण्याचा प्रयत्न रिलायन्सने केलेला दिसतोय. स्टोअर्समध्ये QR-कोड स्क्रीन, सेल्फ-चेकआउट काउंटर, वाय-फाय आणि चार्जिंग स्टेशनसह अनेक टेक टच पॉइंट असणार आहेत. स्टोअर्समधील डिजिटल स्क्रीनवर ग्राहक त्यांना हवे असलेले ब्रांड आणि फॅशन ट्रेंडचे आउटफिट बघू शकतील आणि स्टोअर्स प्रतिनिधीला ऑर्डर देऊ शकतील.
जनरेशन झेड (Gen Z) डोळ्यासमोर ठेऊन रिलायन्सने हा ब्रांड बाजारात आणला आहे. त्यामुळे यासाठी नव्या पिढीच्या आवडी-निवडी, के-ड्रामा, जापनीज ड्रामा, पॉप कल्चरचा अभ्यास करून, त्यातील ट्रेंड ओळखून नवनवे आउटफिट स्टोअर्समध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.