Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'FMCG' उद्योगात एन्ट्रीसाठी रिलायन्स सज्ज! कॅम्पा कोला ब्रँड केला खरेदी

'FMCG' उद्योगात एन्ट्रीसाठी रिलायन्स सज्ज! कॅम्पा कोला ब्रँड केला खरेदी

RIL Acquired Campa Cola Brand: रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी लवकरच रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG उद्योगात रिलायन्स उतरेल, अशी घोषणा केली होती. वार्षिक सभेच्या दोनच दिवसात रिलायन्सने एक शीतपेय ब्रँड थेट खरेदी केला.

नुकताच पार पडलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG उद्योगात उतरेल, अशी घोषणा केली होती. भारतातील प्रचंड वेगाने वाढवणाऱ्या FMCG क्षेत्राताल वृद्धीच्या संधी रिलायन्सला खुणावत आहेत. या इंडस्ट्रीमध्ये आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी रिलायन्सकडून जवळपास डझनभर ब्रँडची निवड करण्यात आली आहे. त्याची सुरुवात ८० च्या दशकात भारतात फेमस झालेल्या कॅम्पा कोला या शीतपेयाच्या ब्रँड पासून झाली आहे. नुकताच रिलायन्सने कॅम्पा हा शीतपेयाचा ब्रँड थेट 22 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

दिवाळीपासून रिलायन्स थेट कोला ब्रँड रिलायन्स रिटेल आणि जिओ मार्टमधून विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. सॉफ्ट ड्रिंक्स बाजारपेठेवर वर्चस्व असलेल्या कोला कोला आणि पेप्सी या अमेरिकन ब्रँड सोबत रिलायन्सची थेट स्पर्धा असेल. आर्थिक उदारीकरणापूर्वी कॅम्पा कोला ब्रॅंडचा जवळपास 20 वर्ष भारतीय बाजारापेठेत दबदबा होता. मात्र उदारीकरणानंतर शीतपेयांचे जागतिक ब्रॅंड्स जसे की कोला कोला, पेप्सी यांनी भारतात मोठी गुंतवणूक केली. शीतपेयांच्या या स्पर्धेत देशी कोला ब्रॅंड मागे पडला. आता मुकेश अंबानी यांनी खरेदी केल्याने मागील तीन दशके सुप्तावस्थेत असलेल्या कॅम्पा कोला ब्रॅंडला नवसंजीवनी मिळणार आहे. प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून रिलायन्सने कॅम्पा कोला ब्रॅंड 22 कोटींना खरेदी केला असल्याचे बोलले जाते.

जिओ मार्टची भूमिका निर्णायक

रिलायन्स समूह 45 वर्षांच्या इतिहासात FMCG व्यवसायापासून अलिप्त होता. अलिकडे जिओ मार्टमधून रिलायन्सने किराणा व्यवसायात प्रवेश केला. किरकोळ किराणा व्यापाऱ्यांना घाऊक दराने माल पुरवण्याचा व्यवसाय मागील दोन वर्ष सुरू आहे. देशभरात जिओ मार्तशी जवळपास 15 लाख व्यवसायिक जोडलेले आहेत. कोला ब्रँड नव्या रुपात ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात जीओ मार्टची ही वितरण साखळी निर्णायक ठरणार आहे. त्याशिवाय रिलायन्स रिटेलकडून FMCG उत्पादनांची विक्री सुरु केल्यानंतर देशभरात वितरण साखळी तयार केली जाईल, असेही बोलले जाते.

दिवाळीपासूनच रिलायन्स कॅम्पा कोलाला बाजारात उतरवेल, अशी माहिती रिलायन्स रिटेलच्या संचालक इशा अंबानी यांनी सांगितले. भारतीयांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल, असे इशा अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स रिटेलने दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध साबणाचा ब्रॅंड, खाद्य तेलाचा ब्रॅंड तसेच नमकिन ब्रॅंडला खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.  

FMCG म्हणजे काय? (What is FMCG?)

रोजच्या वापरातील वस्तू जसे की दूध, फळे, भाजीपाला, टॉयलेट पेपर, स्टेशनरी, शैम्पू, साबण, खोबरेल तेल, कपडे धुण्याचे साबण वैगरे उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. या वस्तूंची किंमती खूपच कमी असल्याने त्यांचा खप देखील खूप आहे. या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे.

FMCG मधील टॉप 5 कंपन्या

  • हिंदुस्थान युनिलिव्हर, महसूल : 40,415 कोटी
  • ITC लिमिटेड, महसूल 74,979 कोटी
  • नेस्ले इंडिया, महसूल : 12,615 कोटी
  • ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड, महसूल 11,878 कोटी
  • मेरिको, महसूल 7,439 कोटी