रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील टायटन आणि टाटा मोटर्स या दोन शेअर्समध्ये सोमवारी (दि. 10 एप्रिल) मोठी वाढ दिसून आली. सोमवारी शेअर मार्केट ओपन झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत, टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 2,598.70 रुपयांवर पोहोचली. NSE मध्ये या शेअर्समध्ये 50.25 रुपयांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे, टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरच्या किमतीत देखील वाढ झाली. यात रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या या शेअर्समुळे त्यांच्या संपत्तीत 400 कोटी रुपयांनी वाढ झाली.
टायटनच्या शेअरमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत वाढ
सोमवारी (दि. 10 एप्रिल) शेअर बाजार उघडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत टायटनच्या शेअरमध्ये 50.25 रुपयांनी वाढ झाली. टायटन कंपनीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग डेटानुसार , रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 4,58,95,970 टायटनचे शेअर्स आहेत. जे कंपनीच्या एकूण भांडवलाच्या 5.17% आहेत. त्यामुळे, सोमवारच्या सत्राच्या काही मिनिटांत टायटनच्या शेअरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर रेखा झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत 230 कोटींनी वाढ झाली.
रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत किती वाढ झाली
रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 230 कोटींनी वाढली व टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 170 कोटी रुपयांनी वाढली. अशाप्रकारे त्यांच्या एकूण संपत्तीत 400 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
शेअर्सची किंमत वाढण्याची कारणे
टायटनचा व्यवसाय FY2023 च्या चौथ्या तिमाहीत 25%ने वाढला आहे. त्याचप्रमाणे टाटा मोटर्सनेही चांगली कामगिरी केली आहे. कंपनीचे जागतिक पातळीवरील विक्रीचे आकडे चांगले आहेत. यामध्ये जॅग्वार, लॅण्ड रोव्हरच्या प्रीमियम कार ब्रॅण्डचा देखील समावेश आहे. चौथ्या तिमाहीत टाटा मोटर्सची जागतिक विक्री 8% वाढून 3,61,361 युनिट झाली. टाटाच्या व्यावसायिक वाहनांची विक्री तीन टक्क्यांनी घसरून 1,18,321 युनिट्सवर आली. या कालावधीत प्रवासी वाहनांची विक्री 10 टक्क्यांनी वाढून 1,35,654 युनिट झाली आहे. यामुळे टाटा समुहातील कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. परिणामी त्याचा फायदा शेअर धारकांना मिळत आहे.