ॲपलने गेल्या काही महिन्यांपूर्वी, एप्रिलमध्ये दिल्ली आणि मुंबईत त्यांचे अधिकृत ॲपल स्टोअर्स सुरु केले आहे. ॲपलने जून तिमाहीत ॲपलच्या उत्पादन विक्रीत चांगलीच आघाडी घेतलेली दिसते आहे. ही माहिती ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी स्वतः दिली आहे. भारतातील ॲपलच्या उत्पादनांची विक्री आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतात नव्याने सुरु झालेले स्टोअर्स ग्राहकांच्या पसंतीस पडत असून, भारतीय ग्राहकांचा उत्साह असाच कायम राहिल्यास कंपनी अधिक चांगली कामगिरी करू शकेल असेही त्यांनी म्हटले आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मार्केट
भारतातील ॲपलच्या कामगिरीबद्दल बोलताना टीम कुक म्हणाले की जून तिमाहीत आम्ही कमाईचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या स्टोअर्सकडून चांगली कामगिरी होते आहे. भारत हा स्मार्टफोन मार्केटच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील स्मार्टफोन युजर्सला अधिकाधिक ऑफर्स देऊन त्यांना आकर्षित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजनांवर काम करत असल्याचे देखील कुक म्हणाले.
Apple ची कमाई 81.8 अब्ज डॉलर्स
टीम कूक याबाबत सविस्तर माहिती देताना म्हणाले की, जून तिमाहीत सेवांमध्ये भारतात आमचा आतापर्यंतचा महसूल रेकॉर्ड आम्ही प्रस्थापित केला आहे. या तिमाहीत आम्ही 81.8 अब्ज डॉलर्सची कमाई केली असल्याचे ते म्हणाले. तसेच 1 अब्जाहून अधिक युजर्सने Apple च्या सशुल्क सेवेचे सबस्क्रिप्शन घेतले असल्याची माहिती देखील कुक यांनी दिली.
Iphone का भारत के बाजार में धमाका, सफलता से खुश हए टिम कुक, 929 डॉलर के ASP के साथ भारत में Apple ने अप्रैल-जून में 61% की वृद्धि दर्ज़ की | #Apple #Iphone #TimCook pic.twitter.com/u1mSYQgto0
— News World India (@NewsNwi) August 4, 2023
वाणिज्य मंत्रालायाच्या आकडेवारीनुसार ॲपलने एप्रिल-जून या कालावधीत भारतातील उत्पादनांच्या विक्रीत तब्बल 61 टक्के वाढ नोंदवली आहे. महत्वाची बाबा म्हणजे ॲपलच्या उत्पादनाची एव्हरेज सेलिंग प्राईस (Aaerage Selling Price) 929 डॉलर्स इतकी होती.
निर्यातीतही आघाडी!
ॲपलने जेव्हापासून भारतात ॲपल स्टोअर्स सुरु केले आहेत तेव्हापासून कंपनीने स्थानिक उत्पादनाचा विक्रमही प्रस्थापित केला आहे. मे महिन्यात, आयफोनच्या निर्यातीने विक्रमी रु. 10,000 कोटींचा टप्पा गाठला होता, ज्यामुळे त्या महिन्यात देशातून एकूण मोबाईल शिपमेंट रु. 12,000 कोटी रुपयांची झाली होती. सॅमसंग, रेडमी,नोकिया आदी कंपन्यांना ॲपलने जोरदार स्पर्धेचे आव्हानच यानिमित्ताने दिले आहे.